Uncategorized

आव्हाड-पडळकरांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी, फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, ‘घडलेली घटना…


महागाव प्रतिनिधी संजय नागरगोजे
Devendra Fadnavis: आमदार जितेंद्र आव्हाड (MLA Jitendra Awhad) आणि भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांच्या कार्यकर्त्यांमध्ये विधानभवनाच्या लॉबीत तुफान हाणामारी झाली आहे. यामुळे विधानभवन परिसरात मोठा तणाव निर्माण झाला. दरम्यान, यावर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnavis) प्रतिक्रिया दिली. विधानभवन परिसरात मारामारी होणं हे विधानभवनाला शोभणारे नाही. या प्रकरणी विधानसभा अध्यक्षांनी कारवाई करावी, असं फडणवीस म्हणाले.

बीडमधील नारायण गडाचा वाद पेटला ! ट्रस्टी व महंत का भिडेलत ? 

माध्यमांशी बोलताना फडणवीस म्हणाले की, घडलेली घटना ही अतिशय चुकीची आहे. विधानभवनात अशा प्रकारची घटना घडणं योग्य नाही. विधानभवन परिसर हा विधानसभेचे अध्यक्ष आणि विधानपरिषदेचे सभापती यांच्या अंतर्गत येतो, त्यामुळं दोघांनीही घडलेल्या प्रकाराची गंभीर दखल घ्यावी, असं फडणवीस म्हणाले. तसेच यावर कडक कारवाई करावी, अशी विनंती मी त्यांनी केल्याचंही फडणवीस म्हणाले.

विधानभवन परिसरात लोक मोठ्या प्रमाणात जमा होतात आणि मारामारी करतात हे विधानभवनाला शोभणारे नाही. म्हणून यावर निश्चित कारवाई ही झालीच पाहिजे, अशी भूमिकाही फडणवीसांनी स्पष्ट केली.

…तर कशाला राहायचे आमदार?, विधानभवनातील राड्यानंतर आमदार आव्हाड संतापले 

आव्हाड काय म्हणाले?
जितेंद्र आव्हाड म्हणाले, मी विधानसभेत भाषण करून थोडी मोकळी हवा घेण्यासाठी सभागृहाबाहेर आलो होतो. तेव्हा हा प्रकार घडला. हे लोक मलाच मारण्यासाठी आले होते. हा हल्ला पडळकरांच्या लोकांनी केला आहे, हे संपूर्ण महाराष्ट्राला समजले आहे. मी स्वतः सुरक्षित नसल्याचं अगोदरच ट्विट केले आहे. मला आई-बहिणीवरून शिवीगाळ करण्यात आली आहे. कुत्रा, डुक्कर म्हटलं आहे. मारून टाकण्याची धमकीही देण्यात आली, असा गंभीर आरोप आव्हाडांनी केला. तसेच विधानसभेच्या पायऱ्यांवर आमदार सुरक्षित नसतील तर कशाला राहायचे आमदार?, असा सवालही आव्हाडांनी केला आहे.

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही या प्रकरणावर नाराजी व्यक्त केली. या गुंडांना कुणी प्रवेशिका दिल्या? त्यांची नावे उघड केली पाहिजेत. तसेच, विधानसभा अध्यक्षांनी हल्ला करणाऱ्या गुंडांवर आणि त्यांच्या पोशिद्यांवर कारवाई करावी, असं ठाकरे म्हणाले

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button