Uncategorized

टेंभी सिमेंट रस्त्याबाबत सरपंचांची प्रतिक्रिया; ‘सध्या फक्त बेड टाकला, अंतिम सिमेंट काम बाकी’


महागाव प्रतिनिधी संजय नागरगोजे
महागाव तालुक्यातील टेंभी येथील सुरू असलेल्या सिमेंट रस्त्याच्या कामाबाबत उपस्थित झालेल्या शंकांवर सरपंच चिकणे यांनी स्पष्टीकरण दिले आहे. त्यांनी सांगितले की, संबंधित ठिकाणी सध्या फक्त रस्त्याचा बेड टाकण्याचे काम करण्यात आले असून अंतिम सिमेंट काँक्रीटचे काम अद्याप बाकी आहे.
“रस्त्यावर तातडीने सिमेंट टाकल्यास ते काही दिवस वाहतुकीसाठी बंद ठेवावे लागेल. परिसरातील रहदारी लक्षात घेता प्रथम बेड टाकण्यात आला आहे. पुढील टप्प्यात नियमानुसार त्यावर सिमेंट रोडचे पूर्ण काम केले जाईल,” अशी माहिती सरपंच चिकणे यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना दिली.
दरम्यान, रस्त्यावरील काम अपूर्ण अवस्थेत दिसत असल्याने ग्रामस्थांमध्ये निर्माण झालेला संभ्रम दूर करण्यासाठी ही प्रतिक्रिया देण्यात आली असून अंतिम काम पूर्ण झाल्यानंतरच रस्त्याचा दर्जा स्पष्ट होईल, असेही त्यांनी नमूद केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button