Uncategorized

धनोडा व पोखरी फाट्यावर किराणा दुकानांत खुलेआम देशी दारू विक्री; नागरिक त्रस्त दारूबंदी अधिकारी व पोलिसांचे दुर्लक्ष? आरोग्य धोक्यात, कारवाईची मागणी


महागाव प्रतिनिधी : संजय नागरगोजे
महागाव तालुक्यातील धनोडा गावात किराणा दुकानांतून खुलेआम देशी दारूची विक्री होत असल्याचा गंभीर प्रकार समोर आला असून, पोखरी फाटा परिसरातही अवैध दारू विक्री सर्रास सुरू असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. व्यसनाधीनतेला खतपाणी घालणाऱ्या या बेकायदेशीर विक्रीमुळे तरुण पिढी व्यसनाच्या गर्तेत जात असल्याची चिंता व्यक्त केली जात आहे.
किराणा दुकानाच्या आडून देशी दारूची विक्री होत असताना दारूबंदी अधिकारी व पोलिस प्रशासनाचे दुर्लक्ष असल्याचे चित्र दिसून येत आहे. आजपर्यंत अवैध दारू विक्री करणाऱ्यांवर कोणतीही ठोस कारवाई न झाल्यामुळे प्रशासनाच्या भूमिकेवर नागरिक संशय व्यक्त करत आहेत.
या भागात डुप्लिकेट देशी दारूचा सर्रास वापर होत असल्याची माहिती समोर आली असून, त्यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. बनावट दारू सेवनामुळे विषबाधा, गंभीर आजार व मृत्यूचेही धोके संभवतात, अशी भीती व्यक्त होत आहे.
विशेष म्हणजे २६ जानेवारी रोजी दारूबंदी असतानाही अवैध विक्री सुरू असल्याचे आरोप होत असून, कायद्याला हरताळ फासण्याचा हा प्रकार प्रशासनासाठी मोठे आव्हान ठरत आहे.
नागरिकांनी दारूबंदी अधिकारी व पोलिस प्रशासनाने तातडीने छापे टाकून अवैध दारू विक्री करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, बनावट दारूचा साठा जप्त करावा आणि दोषींवर गुन्हे दाखल करावेत, अशी जोरदार मागणी केली आहे.
दारूबंदी कायदा कागदावरच राहणार की प्रत्यक्षात अंमलात येणार? असा सवाल महागावकरांकडून उपस्थित केला जात आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button