उमरखेड हादरलं! प्रशासन झोपेत — नागरिकांच्या जीवाशी खेळ सुरू

एकाच दिवशी तब्बल 30 नागरिकांना कुत्र्यांचा चावा — तरीही प्रशासन मुकेदर्शक!
मुख्य संपादक
उमरखेड शहरात भटक्या कुत्र्यांचा अक्षरशः उच्छाद माजला असून, नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न अत्यंत गंभीर बनला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, केवळ एका दिवसात 30 नागरिकांना कुत्र्यांनी चावा घेतल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. जखमींमध्ये लहान मुले, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांचा समावेश असून शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. प्रशासनाची निष्क्रियता उघड
वारंवार तक्रारी करूनही नगरपरिषद प्रशासनाने कोणतीही ठोस कारवाई केलेली नाही भटक्या कुत्र्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून नियंत्रण यंत्रणा पूर्णपणे अपयशी
निर्बिजीकरण मोहिम फक्त कागदावर — प्रत्यक्षात शून्य परिणाम आरोग्य यंत्रणा अलर्टवर, पण उपाय कुठे?जखमींना ग्रामीण रुग्णालयात उपचार गंभीर रुग्णांना नांदेड येथे हलविण्याची वेळ रेबीज इंजेक्शन देण्यात आले, मात्र घटना रोखण्यात अपयश प्रशासनाची केवळ आश्वासने
मुख्याधिकारी यांनी दोन दिवसांत टेंडर काढण्याचे सांगितले, मात्र नागरिकांचा सवाल तोपर्यंत अजून किती जणांचा बळी जाणार?
नागरिकांचा संताप उफाळला शाळकरी मुले आणि महिलांसाठी रस्त्यावर चालणेही धोकादायक
शहरातील प्रमुख रस्ते आणि गल्लीबोळात कुत्र्यांचे टोळके
नागरिकांचा इशारा: तात्काळ कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन छेडणार
थेट सवाल प्रशासनाला
“लोकांच्या जीवाशी खेळणारे हे निष्क्रिय प्रशासन नेमके काम कधी करणार?”
भटक्या कुत्र्यांवर तातडीने नियंत्रण मोहीम राबवावी
निर्बिजीकरण व लसीकरण तातडीने सुरू करावे
धोकादायक भागांमध्ये विशेष पथक तैनात करावे
जबाबदार अधिकाऱ्यांव कारवाई करावी
ही वेळ शब्दांची नाही कृतीची आहे!
उमरखेडकर आता गप्प बसणार नाहीत!
पा. उमरखेड वार्ता



