Uncategorized

भारतीय जनता पक्ष महागाव शहर पदाधिकाऱ्यांची आमदार साहेबांना विविध समस्या सोडण्याची मागणी( आमदार साहेब समस्या सोडणार का?)


महागाव प्रतिनिधी संजय नागरगोजे

महागांव शहरातील साईनगरी येथील वॉल कंपाऊंडच्या उद्घाटनाप्रसंगी आमदार साहेब किसनराव वानखेडे आले असताना त्यांना महागांव शहरातील सर्व समस्या निवेदना मार्फत मांडण्यात आल्या
1) त्यामध्ये महागांव शहरातील ठिकठिकाणी कचऱ्याचे ढिगारे व घाणीचे साम्राज्य असल्यामुळे पावसाळ्यात साथीचे रोग पसरत आहेत त्यावर उपाययोजना करून कचऱ्याच्या ढिगार्‍याची विल्हेवाट लावण्यात यावी
2) प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत घरकुल लाभार्थ्यांना 3.28 लाख निधी आला नगरपंचायतच्या हलगर्जीपणामुळे 2 कोटी 39 लाख हा निधी वापस गेला हा निधी परत मिळून घरकुल लाभार्थ्यांना वाटप करण्यात यावा


3)महागांव शहरात ठीक ठिकाणी खड्डे पडले असून आता पावसाळ्यात नागरिकांना रहदारीसाठी प्रचंड त्रास होत आहे त्यामुळे शहरातील संपूर्ण प्रभागातील रस्त्यामध्ये पडलेले खड्डे बुजवून रस्ते सुरळीत करण्यात यावे
4) महागांव शहरातील सर्व ठिकाणच्या नाल्या सांडपाण्याने तुडुंब भरल्या आहेत त्यामुळे डासांचा प्रादुर्भाव निर्माण झाला आहे तरी या नाल्या सुरळीतपणे साफ करण्यात याव्या
5 )महागांव शहरातील प्रभाग क्रमांक 11 मध्ये गेल्या कित्येक महिन्यापासून सुरळीत पाणीपुरवठा नसल्यामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे यावर उपाययोजना करून सुरळीत पाणीपुरवठा करण्यात यावा
6 )सततच्या अवकाळी पावसामुळे ठिकठिकाणी पाणी साचून डासांचा प्रादुर्भाव निर्माण झाला आहे त्यामुळे डेंगू मलेरिया सारखे जीवघेणे रोग पसरत आहेत त्यामुळे फवारणी करून डासांची प्रतिबंधात्मक कार्यवाही करण्यात यावी
अशा आशयाचे निवेदन यावेळी देण्यात आले हे सर्व काम मुख्य कार्यकारी अधिकारी नगरपंचायत यांच्याकडून करून घ्याव्या असे निवेदनाद्वारे मागणी केली यावेळी भारतीय जनता पक्ष उपशहर अध्यक्ष महागांव विवेक राजेंद्र नरवाडे व भारतीय जनता पक्ष महागांव सचिव दीपक तुकाराम तायवाडे व इतर सर्व सदस्य उपस्थित होते आमदार साहेबांनी मुख्य कार्यकारी अधिकारी नगरपंचायत यांच्याकडून सोडून घेऊ असे आश्वासन दिले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button