Uncategorized
शेतकऱ्याचे सातबारा कोरा कर्जमुक्तीसाठी प्रहार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष माजी मंत्री बच्चुभाऊ कडू यांची रविवारला अंबोडा येथे आढावा बैठक संपन्न !

महागाव प्रतिनिधी संजय नागरगोजे
आज दिनांक 6-7- 2025 रोजी, आंबोडा येथे गजानन महाराज मंदिरात माजी मंत्री बच्चुभाऊ कडू यांच्या उपस्थितीत आढावा बैठक घेण्यात आली त्यामध्ये त्यांनी पंजाबराव देशमुख यांच्या जन्मगाव पहापळ ते देशातील पहिली शेतकरी आत्महत्या ग्रस्त शेतकरी कुटुंब साहेबराव पाटील करपे यांचे गाव चिलगव्हाण पर्यंत शेतकरी संवाद यात्रा शेतकऱ्यांचा सातबारा कोरा कर्जमुक्ती करण्यासाठी अभियान राबवण्यात येत आहे ! या अभियानाचा समारोप अंबोडा येथे गजानन महाराज मंगल कार्यालयात होणार आहे ! करीता आढावा बैठकीला महागाव तालुक्यातील शेतकऱ्यांनी मोठी उपस्थिती लावली होती प्रा . सिताराम ठाकरे ,पंजाबराव खडकेकर, तात्या शिंदे ,शेतकरी संघटनेचे मनीष जाधव, हतवंतराव देशमुख डॉ . संदीप शिंदे व महागाव वाताचे संपादक विजय सूर्यवंशी इतर शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.



