Uncategorized

जोरदार वाऱ्याने शेतकऱ्याचे सोलर पंप पडले उलमडून- लाखांचे नुकसान उमरखेड तालुक्यातील लोहरा येथील घटना

एस पी दळवी

उमरखेड तालुक्यातील लोहरा गावात जोरदार वाऱ्यामुळे शेतकऱ्याच्या शेतात बसवलेले सोलर पंप उलमडून पडल्याची घटना शनिवार, ५ जून २०२६ रोजी सायंकाळी ५ वाजताचे दरम्यान घडली असून या दुर्घटनेत सोलर पॅनल्स फुटून लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.

लोहरा येथील शेतकरी मारोती बबन शिंदे यांच्या सर्वे नं. २१/२ मधील शेतात ECOZEN कंपनीचा सोलर पंप बसवण्यात आला होता. शनिवारी सकाळी वाजता ७:२० वाजता शेतात गेलेल्या शिंदे यांना सोलर स्ट्रक्चर जमिनीवर पडले दिसले. वाऱ्याच्या तडाख्याने लोखंडी स्टँडसह पॅनल्स उलमडून पडली असून, अनेक पॅनल्सचे काच फुटले आहेत. काही पॅनल्स पूर्णपणे तुटून पडले आहेत.

घटनेची माहिती सोलर एजंटना कळवण्यात आले असल्याची माहिती शिंदे यांनी दिली फुटलेले पॅनल्स, वाकलेली फ्रेम आणि पडलेला कंट्रोलर बॉक्स पाहता शेतकऱ्याचे मोठे आर्थिक नुकसान झाल्याचे दिसून येते.

शेतकरी मारोती शिंदे यांनी सांगितले की, “पिकासाठी पाणी देण्यासाठीच सोलर पंप बसवला होता आता वाऱ्यामुळे सगळेच उद्ध्वस्त झाले शेतीचे काम ठप्प झाले आहे.”

सध्या पावसाळ्यापूर्वीच्या वादळी वाऱ्याचा तडाखा ग्रामीण भागात बसत आहे नुकसानग्रस्त सोलरची नुकसान भरपाई देण्याची मागणी सदर शेतकऱ्यांनी केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button