Uncategorized

महिलांच्या आंदोलनानंतर हातभट्टी दारूवर धडक कारवाई एलसीबी पथकाची करंजखेड–फुलसांगी येथे संयुक्त छापेमारी; ५७,५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त

महागाव प्रतिनिधी संजय नागरगोजे

आमणी, करंजखेड व पिंपरी परिसरात गावठी हातभट्टी दारू बंद करण्यासाठी महिलांनी वारंवार Mahagaon Police Station येथे आंदोलन केले होते. अखेर या आंदोलनाची दखल घेत Local Crime Branch Yavatmal (एलसीबी) पथक, पुसद यांनी संयुक्त कारवाई करत हातभट्टी दारू तयार करून विक्री करणाऱ्यांवर धडक कारवाई केली. २७ फेब्रुवारी २०१९ रोजी सकाळी साडेअकरा ते साडेचार दरम्यान करंजखेड व फुलसांगी गावाच्या हद्दीत छापेमारी करण्यात आली. या कारवाईत करंजखेड येथील राहुल ज्ञानेश्वर राकडे (वय २३), तसेच फुलसांगी हद्दीतील अरविंद दत्ता राठोड (वय ३५) व श्याम दत्ता जाधव यांना गावठी हातभट्टी दारू तयार करून विक्री करताना पकडण्यात आले. तीन्ही कारवायांत मिळून अंदाजे ५७,५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आवश्यक नमुने (सॅम्पल) घेऊन उर्वरित मुद्देमाल जागीच नष्ट करण्यात आला. पुढील कायदेशीर कारवाई महागाव पोलीस स्टेशन येथे सुरू करण्यात आली आहे. ही कारवाई एपीआय धीरज बांडे, पीएसआय शरद लोहकरे, एएसआय मुन्ना आडे, तसेच कर्मचारी तेजस रंखांब, सुनील पंडागळे, राजेश जाधव आदींच्या पथकाने पार पाडली. दरम्यान, येणाऱ्या काळात दारूबंदी प्रभावी करण्यासाठी स्टिंग ऑपरेशन राबविण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. महिलांच्या सातत्यपूर्ण आंदोलनानंतर झालेल्या या कारवाईमुळे परिसरात समाधान व्यक्त होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button