Uncategorized

स्वातंत्र्यदिनी रस्ता दुरुस्तीच्या मागणीसाठी भर पावसात आझाद समाज पक्षाचा रास्तारोको(आक्रमक आंदोलकांचा अभियंत्याला घेराव , तब्बल दोन तास वाहतूक व्यवस्था खोळंबली )

शेख मुजाहिद ससंपादक मो.7798306192

उमरखेड प्रतिनिधी, हरदडा फाटा ते पुसद रस्ता दुरुस्तीचे काम तब्बल वर्षभरापासून रखडल्याने आझाद समाज पक्षाच्या वतीने 15 ऑगस्ट स्वातंत्र्यदिनी दुपारी 12 वाजता भर पावसात हरदडा फाटा येथे चक्काजाम आंदोलन करण्यात आले, या आंदोलनामुळे प्रशासनाची एकच तारांबळ उडाली रस्त्याच्या दोन्ही कडेला वाहनाच्या लांब लांब रांगा पाहायला मिळाल्या, यामुळे तब्बल दोन तास वाहतूक खोळंबली होती,
हरदडा फाटा ते पुसद या सिमेंट रस्त्याचे काम महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळामार्फत तब्बल 254 कोटी रुपये खर्चून जी एन आय इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीला देण्यात आले, तब्बल वर्ष ओलांडूनही संबंधित कंत्राटदाराकडून रस्ता दुरुस्तीचे काम होत नसल्याने दिनांक 30 जुलै रोजी आझाद समाज पक्षाच्या वतीने रस्ता दुरुस्तीची मागणी साठी उपविभागीय अधिकारी यांच्यामार्फत कार्यकारी अभियंता महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा महामंडळ यांना निवेदन देण्यात आले होते, संबंधित विभाग आणि कंत्राटदाराने रस्ता दुरुस्तीस सुरुवात न केल्याने आजाद समाज पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेत हरदडा फाटा येथे भर पावसात चक्काजाम आंदोलन केले,
यावेळी आंदोलकांनी हातात तिरंगा ध्वज घेत महाराष्ट्र पायाभूत सुविधा विकास महामंडळ, व संबंधित कंत्राटदाराच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली, रस्ता दुरुस्ती करणाऱ्या संबंधित कंपनीचे अभियंता यांना धारेवर धरत रस्त्याच्या भूमिपूजनाचीही मागणी केल्याने काही काळ तणावाचे किती निर्माण झाली होती,आक्रमक आंदोलकांचा रौद्र अवतार पाहताच अभियंत्याने संबंधित विभागाचे वरिष्ठ अधिकारी संबंधित कंपनी यांच्याशी चर्चा करून तातडीने रस्त्याची खड्डे बुजवण्याचे काम सुरू करून व हरदडा फाटा येथून विडुळ मार्गे पुसद नव्याने सिमेंट रस्त्याच्या दुरुस्तीचे काम करणार असल्याचे महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळ कार्यकारी अभियंता यांच्या स्वाक्षरीचे लेखी पत्राद्वारे आश्वासन दिले, त्यानंतर महिला आंदोलक व अभियंता यांच्या हस्ते रस्त्यावर नारळ फोडून रस्ता रस्ता दुरुस्तीचे उद्घाटन करण्यात आले ,,
चक्काजाम आंदोलनादरम्यान उमरखेड वरून ढाणकी , व हिमायतनगर जाणारे वाहतूक थांबल्याने एक

किलोमीटर पर्यंत वाहनाच्या लांबत लांब रांगा पाहायला मिळाल्या, संबंधित विभागाने दिलेला शब्द न पाळल्यास यापेक्षाही तीव्र स्वरूपाचे जन आंदोलन छेडण्याचा इशारा इशारा आजाद समाज पक्षाचे जिल्हाध्यक्ष
प्रशांत उर्फ जॉन्टी विणकरे , जिल्हा महासचिव संतोष जोगदंडे, तालुकाध्यक्ष देवानंद पाईकराव यांनी दिला यावेळी आझाद समाज पक्षाचे तालुका महासचिव सचिन वाहुळे, लक्ष्मण धुळे, विष्णू वाडेकर, जिल्हा संघटक बिलाल राज, प्रफुल दिवेकर, गोलू मुनेश्वर, संतोष भुवाळ, संतोष गायकवाड, मुजीब लाला,शब्बीर भाई, समाधान राऊत, गजानन कामशेटवाड, शेख करीम, सचिन कांबळे, सुधाकर कदम, हनी घुगरे, सुधाकर राऊत, हिरामण कांबळे, सुमित बुरसे, भारत कांबळे, नागेश उचले
यांच्यासह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते
कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून उमरखेड पोलीस स्टेशनचे ठाणेदार यांच्या मार्गदर्शनात चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button