Uncategorized

पुराच्या पाण्यामुळे शेती पिकाचे व सिमेंट बंधारा फुटून मोठ्या प्रमाणात शेतीचे नुकसान.

महागाव प्रतिनिधी संजय नागरगोजे
महागाव तालुक्यातील कासार बेहळ सेवा नगर परिसरामध्ये शुक्रवार रोजी झालेल्या मुसळधार पावसामुळे परिसरातील पैनगंगा नदी पूर आल्यामुळे कासार बेहळ सेवा नगर येथील नाल्यालगत च्या शेतकऱ्याचे पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे पैनगंगा नदीला आलेल्या पुरामुळे गजानन लांडगे सेवा नगर शेत सर्वे नंबर 29 यांच्या शेतातील सिमेंट बंधारा फुटून मोठ्या प्रमाणात शेतीचे नुकसान झाले नदी लगत असलेल्या या शेतकऱ्याचे कापूस तूर पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले कासारबेहळ सेवा नगर येथील शेतकऱ्यांच्या शेतात नदी नाल्याचा पूर आल्याने शेतकऱ्याचे कापूस सोयाबीन तूर ऊस व इतर

पिकाचेप्रचंड नुकसान झाले आहे महसूल विभागाने त्वरित पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याची मागणी शेतकरी करत आहे तसेच कृषी विभागाने लक्ष देऊन सिमेंट बंधाऱ्यामुळे नुकसान झालेल्या शेतीचे पंचनामा करून शेतकऱ्याला मदत देण्यात यावी शेतकरी गजानन लांडगे करत आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button