Uncategorized

बारभाई तांडा ते दरदेववाडी (माळ) येथील अतिक्रमणीत रस्ता खुल्ला करून द्यावा ; शेतकऱ्यांची मागणी


(वारंवार मागणी करून सुद्धा तहसीलदाराचे दुर्लक्ष)

महागाव प्रतिनिधी संजय नागरगोजे

बारभाई तांडा ते दरदेववाडी (माळ) पठार राऊतवाडी व लेवा शिव शासकीय पांदण रस्त्यांत काही लोकांनी पूर्णतः अतिक्रमण केले आहे. पूर्वीपासून या ठिकाणी शेतकरी शेती वहीती करीत असतांना वापराचा पांदन रस्ता होता. काही लोकांनी तो पूर्णतः अतिक्रमणात कमी केल्याने शेतीच्या कामासाठी या ठिकाणाहून येजा करताना प्रचंड त्रास होत आहे. पांदण रस्ता खुला करून मिळावा यासाठी लोकशाही दिनी शेतकऱ्यांनी तक्रार दाखल करून रस्ता खुला करून मिळावा यासाठी मागणी केली.

या रस्त्याने येथील शेतकरी पूर्वीपासून येजा करीत आपली शेतीची कास्तकारी करीत होते. सदर बैलगाडीचा 33 फुटाचा शासकीय रस्ता पूर्वी पासून होता. या रस्त्यावर काही शेतकऱ्यांनी अतिक्रमण करून पूर्णतः बंद केला. सतीश गुलाब देशमुख ( लेवा) तसेच दत्ता नरसिंग चव्हाण, पार्वतीबाई नानू चव्हाण, सुभाष मंगू पवार या बारभाई तांडा येथील लोकांनी या शासकीय पांदन रस्त्यावर अतिक्रमण केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. पूर्वीपासून असलेला 30 फुटाचा शासकीय पांदन रस्त्यावर अतिक्रमण केल्याने पाच फुटाचा राहिला आहे. या पांदन रस्त्यावर शेती करण्यासाठी बैलगाडीतून शेती उपयोगी साहित्य, खत, बी- बियाणे, औषधे नेऊन शेती करण्यासाठी रस्ताच उरलेला नाही. वरील व्यक्तींनी शेतीच्या दोन्ही बाजूने तार कुंपण केले आहे. रस्त्यावर काटे, गोटे टाकुण अर्थळा निर्माण करीत वरील व्यक्तींनी आपल्या शेतातील ओसरणारे पाणीही या पांदण रस्त्यामध्ये सोडले आहे. त्यामुळे जाण्या येण्यासाठी प्रचंड त्रास सोसावा लागत आहे. आमची शेती पूर्णतः पडीक पडल्यात जमा असून शेतकऱ्यांनी शेती करण्यासाठी शेती अवजारे, बैलगाडी जाण्या येण्यासाठी रस्ता खुला करून मिळावा म्हणून महागाव तहसील प्रशासनाकडे न्याय मागितला आहे. मंडळ अधिकारी व तलाठी यांच्यामार्फत मोका पाहणी करून सदर शासकीय पांदण रस्ता मोकळा करून देण्यात यावा. आमचा जीवन चरितार्थ संपूर्ण शेती व्यवसायावर अवलंबून असल्याने आता शेतकऱ्यांना शेती करणे कठीण झाले आहे, त्यामुळे उपासमारीची वेळ आल्याचे तक्रारीतून म्हटले आहे. वरील व्यक्तींच्या त्रासाने आम्हाला आत्महत्या करून एकदाचे जीवन संपविण्याशिवाय मार्ग दिसत नसल्याचे म्हटले आहे. लोकशाही दिनी पांदण रस्ता मागणीसाठी शेतकऱ्यांनी दिलेल्या तक्रारीवर विनोद राठोड, बाबूसिंग जाधव, दैवता देशमुख, शुभम देशमुख, पवन राठोड, रोहिदास चव्हाण, साहेबराव राठोड, बाली राठोड, प्रदीप राठोड, रमेश राठोड, माणिक राठोड, वर्षा पवार, मांगीलाल राठोड, हरी जाधव, देवकाबाई पवार, केशव पवार, सुनील देशमुख, जयसिंग चव्हाण यांचे सह सक्रू राठोड यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button