Uncategorized

घरकुल अपहार प्रकरणी माहूरच्या तत्कालीन मुख्याधिकाऱ्यावर गुन्हा दाखल प्रधानमंत्री आवास योजनेचा २ कोटी ७ लक्ष रुपयांचा निधी इतरत्र वळविला


​

(प्रतिनिधी: शेख खय्यूम )
​माहूर (दि. २४ जून): माहूर नगरपंचायतीत सन २०१८ ते २०२१ पर्यंत प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत दिलेला २ कोटी ७ लक्ष १ हजार ७०० रूपयांचा निधी योजनेच्या पात्र लाभार्थ्यांच्या खात्यात वर्ग न करता इतर खात्यात वळविण्यात आला आहे. या अनियमितता व अपहार प्रकरणी तत्कालीन मुख्याधिकाऱ्यांसह संबंधित अधिकाऱ्याविरुद्ध २४ जून रोजी रात्री माहूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्याने नगरपंचायत प्रशासनात एकच खळबळ उडाली आहे.
​मुंबई येथील म्हाडा दक्षता व सुरक्षा विभागाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश विष्णू चव्हाण यांनी २४ जून रोजी रात्री माहूर पोलीस ठाण्यात रितसर फिर्याद दाखल केली. तक्रारीत नमूद केल्याप्रमाणे, नगरपंचायतमध्ये ७ सप्टेंबर २०१८ ते ९ ऑगस्ट २०२१ या कालावधीत म्हाडाकडून प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घरकुल धारकांना वितरित केलेला निधी लाभार्थ्यांना न देता, तो लाभार्थ्यांव्यतिरिक्त इतर खात्यांवर वळवून २ कोटी ७ लक्ष २ हजार ७२४ रुपये एवढ्या रकमेचा अनियमितपणे अपहार करण्यात आला आहे.
​फिर्यादीच्या तक्रारीवरून व जबाबदावरून उपविभागीय पोलीस अधिकारी किरण भोंडवे यांच्या आदेशाने तत्कालीन मुख्याधिकारी व संबंधित अधिकाऱ्यांविरुद्ध बुधवारी रात्री कलम ४०९, ४२०, ३४ आयपीसी प्रमाणे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक देविदास चोपडे हे करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button