शहर

महागाव पोलीस स्टेशन अंतर्गत अवैध धंदे बंद करण्याबाबत महिलांचे निवेदनमहागाव येथील देशी दारूचे दुकान नियमबाह्य सकाळी सुरू राहते त्याला बंदी घालतील का?

महागाव प्रतिनिधी संजय नागरगोजे
महागाव तालुक्यात अवैध धंदे जोमाने सुरू असून सर्व परिसरात गावामध्ये अवैध दारू जोमाने सुरू आहे .त्यामुळे महागाव तालुक्यातील महिलांनी पोलीस स्टेशनला येऊन एल्गार पुकारू सर्व परिसरातील करंजखेड ,मुडाना ,ईजनी,काळी ,टेभी, फुल सांगी ,मोजा पिंपळगाव ई . ता . महागांव येथील महिला व पुरुष मंडळी गांवातील अवैध गावठी दारू बंद करावी गावातील कायदा आणि सुव्यवस्था तसेच महिलांना मारहाण होण्याचे प्रभात मोठ्या प्रमाणात वाढले आहे त्यामुळे गावागावात वाद निर्माण होत आहे, तसेच चोरीचे प्रकार वारंवार होत असल्यामुळे परिसरात अवैध धंद्याचा सुळसुळात झाल्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचे प्रश्न निर्माण झाला आहे महागाव पोलीस स्टेशन चे ठाणेदार यांना निवेदन देण्यासाठी महिलांनी पुढाकार घेऊन व पुरुष मंडळी त्यांना पाठिंबा देऊन पोलीस स्टेशन महागाव येथे निवेदन देण्याकरता आले असता एपीआय मॅडम यांनी निवेदन स्वीकारून घेतले महागाव तालुक्यातील अवैध धंदे बंद करावे अन्यथा मोठे आंदोलन केले जाईल असे निवेदन देण्यात आले परंतु निवेदनाप्रमाणे पोलीस स्टेशन अधिकारी कर्मचारी कारवाई करतील का? महागाव येथे देशी दारूचे दुकान सकाळीच सहा वाजता सुरू करू देशी अवैध दारू विकल्या जाते ती खेडोपाडी जाते तसेच मोहाची हातभट्टी प्रत्येक गावामध्ये पाडली जाते त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यामुळे पोलीस अधीक्षक महागाव तालुका पोलीस स्टेशन अंतर्गत अवैध दारू व मटका बंद करतील का? हा प्रश्न सर्व परिसरातील महिला मंडळींनी उपस्थित केला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button