करंजी ग्रामपंचायतीत भ्रष्टाचाराचा आरोप; ग्रामसभेत भांडाफोड

महागाव प्रतिनिधी संजय नागरगोजे
करंजी ग्रामपंचायत (ता. महागाव) येथे ग्रामसेवक व सरपंच यांच्या संगनमताने शासन निधीमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केल्याचा गंभीर आरोप नागरिकांनी केला आहे. 2021 ते 2026 या कालावधीत विविध विकासकामांच्या नावाखाली बोगस बिले काढल्याचा आरोप ग्रामसभेत उघडकीस आला.
ग्रामसभेत उघड झालेले प्रकार
ग्रामसभेदरम्यान नागरिक व सामाजिक कार्यकर्त्यांनी खालील कामांमध्ये अनियमितता झाल्याचा दावा केला —
नाली बांधकाम व बंदिस्त नाली कामे – प्रत्यक्ष काम न करता लाखो रुपयांची बिले
नालादृष्टी व नाली उपसणे – ₹2,00,000 व ₹62,792 खर्च दाखविला
पाणीपुरवठा दुरुस्ती – ₹92,557
वॉटर फिल्टर दुरुस्ती न करता बिले
शाळा दुरुस्ती – ₹1,00,000
शाळेचे वीज बिल – ₹30,000
ब्लिचिंग पावडर/पाणी शुद्धीकरण – ₹24,243
अंगणवाडी फर्निचर – ₹61,705
अंगणवाडी दुरुस्ती – ₹46,822
“आपले सरकार सेवा केंद्र” मानधन – ₹61,705
सौर पॅनल दिवे – ₹1,00,000
कोविड फवारणी खर्च – ₹50,000
नागरिकांचा आरोप आहे की, ही बहुतांश कामे प्रत्यक्षात न करता ठराव घेऊन शासनाच्या निधीतून रक्कम काढण्यात आली.
💰 15 वा वित्त आयोग निधीत अनियमितता?
सन 2021-22 मधील 15 वा वित्त आयोग अंतर्गत मिळालेल्या निधीत मोठ्या प्रमाणात तफावत आढळल्याचा आरोप करण्यात आला आहे. कामांचे मोजमाप पुस्तिका (एम.बी.), प्रत्यक्ष पाहणी आणि लेखापरीक्षण केल्यास गैरव्यवहार स्पष्ट होईल, असा दावा तक्रारदारांनी केला आहे.
⚖️ शासकीय ऑडिट व फौजदारी कारवाईची मागणी
सामाजिक कार्यकर्ते व ग्रामस्थांनी सर्व संबंधित कामांचे शासकीय ऑडिट करून गावात प्रत्यक्ष पाहणी करावी, तसेच दोषींवर तात्काळ फौजदारी गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी केली आहे.
ग्रामसभेत हा मुद्दा चर्चेत आल्यानंतर गावात संतापाचे वातावरण असून, वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीने चौकशी करावी अशी मागणी जोर धरत आहे.



