Uncategorized
पैनगंगा नदी पात्रात पुरामुळे एक इसम वाहून आला

महागाव प्रतिनिधी संजय नागरगोजे
महागाव व मराठवाड्यात सतत दोन-तीन दिवसांच्या पावसामुळे पैनगंगा नदीला मोठा पूर आला होता व आता सुद्धा सुरू आहे. त्यामध्ये आज सेवानगर कासाळबळ येथे नदीकाठी गजानन लांडगे यांच्या शेताजवळ एक अज्ञान व्यक्ती नदीच्या पुरामध्ये वाहून आला त्याच नाव ठिकाण व पत्ता अजून लागला नाही पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पुढील कारवाई सुरू आहे. व्हाट्सअप माध्यमातून अनोळखी इसमाची ओळख पटवणे सुरू आहे. पोलिसांनी पंचनामा करून मृत व्यक्तीला पीएम साठी पाठवण्यात आले आहे.



