शहर

महागाव तालुक्यात फिटनेस व इन्शुरन्स नसलेले टिप्पर बिनधास्त; आरटीओ-ट्रॅफिक कारवाईवर प्रश्नचिन्ह


महागाव प्रतिनिधी संजय नागरगोजे
महागाव तालुक्यात इन्शुरन्स व फिटनेस नसलेले टिप्पर भरधाव वेगाने रेती वाहतूक करत असल्याचे चित्र दिवसेंदिवस दिसून येत आहे. शासनाच्या नियमांची सर्रास पायमल्ली करत वरुडी, फुलसावंगी, महागाव, पुसद, भोसा या मार्गांवर रात्रंदिवस अवैध रेती वाहतूक सुरू असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे.
नागरिकांचा सवाल आहे की, साध्या दुचाकीस्वारांना थांबवून हायवे पोलीस व ट्रॅफिक विभाग कागदपत्रांची तपासणी करतात, मात्र अशा अवजड टिप्परवर कारवाई का होत नाही? आरटीओ व वाहतूक विभागाला ही वाहने दिसत नाहीत का, की जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
महागाव परिसरात याच प्रकारच्या टिप्परमुळे अपघात होऊन नागरिकांचे प्राण गेल्याच्या घटना घडल्या आहेत. तरीही प्रशासन गप्प का आहे, असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत. फिटनेस व इन्शुरन्स, नंबर प्लेट नसलेल्या वाहनांमुळे अपघात झाल्यास जखमी किंवा मृतांच्या कुटुंबाला विमा दावा (क्लेम) मिळणे अत्यंत कठीण होत आहे, त्यामुळे सामान्य नागरिकांचे मोठे नुकसान होत असल्याचेही सांगण्यात येत आहे.
कायद्यानुसार प्रत्येक अवजड वाहनाला फिटनेस प्रमाणपत्र व इन्शुरन्स, नंबर प्लेट बंधनकारक असताना, महागाव तालुक्यात आरटीओ केवळ वसुलीच्या भूमिकेत असल्याचा आरोप होत आहे. महिन्यातून दोन वेळा २४ तास आरटीओची व्हिजिट असते, मात्र तरीही आजपर्यंत अशा टिप्परवर ठोस कारवाई झाल्याचे दिसून येत नाही, हे विशेष असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या जीवाशी खेळणाऱ्या फिटनेस व इन्शुरन्स, नंबर प्लेट नसलेल्या वाहनांवर तातडीने कारवाई करावी, अवैध रेती वाहतूक थांबवावी, अशी जोरदार मागणी महागाव तालुक्यातील नागरिकांकडून केली जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button