Uncategorized

चुरमुरा येथे आंबेडकर जयंती उत्साहात साजरी विविध उपक्रमाचे करण्यात आले आयोजन

सहसंपादक शेख मुजाहिद

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त ग्रामस्थांच्या वतीने चुरमुरा ता. उमरखेड येथे अभिवादनाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी विविध मान्यवरांच्या उपस्थितीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतीमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सुनिल पाटील चिंचोलकर होते. तर चुरमुरा येथील पोलीस पाटील नारायण पवार, शिवाजी माकोडे, रिपब्लिकन सेनेचे संतोष ठमके, शुद्धोधन दिवेकर, देवराज गोडबोले यांची प्रमुख उपस्तीथी लाभली होती.
कार्यक्रमाची प्रस्तावना गौतम दवणे यांनी केली तर सूत्रसंचालन संदीप राऊत यांनी केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षीय भाषणामध्ये सुनिल पाटील चिंचोलकर यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याचा गौरव करतांना सांगितले की, त्यांनी समानता, स्वातंत्र्य आणि बंधुता या मूल्यांवर आधारित समाज रचना घडवून देशाला भक्कम संविधान दिले. त्यांचे विचार आजही समाजासाठी प्रेरणादायी आणि मार्गदर्शक आहेत.
चुरमुरा ग्रामपंचायत सदस्य किरण दवणे यांच्या पुढाकाराने जयंतीचे औचित्य साधून विविध उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. अल्पोहारानंतर कार्यक्रमाची सांगता झाली. यावेळी चुरमुरा व पार्डी येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button