Uncategorized

पिंपळगाव कान्हा येथील प्रधानमंत्री घरकुल योजनेतील कथित गैरव्यवहाराची चौकशी करण्याची मागणी


महागाव, प्रतिनिधी संजय नागरगोजे
तालुक्यातील पिंपळगाव कान्हा येथील प्रधानमंत्री घरकुल योजनेच्या अंमलबजावणीत कथित गैरव्यवहार झाल्याचा आरोप करत ग्रामस्थ विकास प्रताप राठोड व गणेश गुलाब शिंदे यांनी गटविकास अधिकारी, पंचायत समिती महागाव यांच्याकडे लेखी तक्रार दाखल करून सखोल चौकशीची मागणी केली आहे.
तक्रारीनुसार, काही लाभार्थ्यांनी प्रत्यक्ष घराचे बांधकाम न करता इतरांच्या घरांचे फोटो सादर करून शासकीय अनुदान घेतल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच अपंग, विधवा व भूमिहीन अशा पात्र लाभार्थ्यांना घरकुलाचा लाभ न देता आर्थिक व्यवहार करून काही व्यक्तींना लाभ देण्यात आल्याचाही आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून दोषी आढळणाऱ्या संबंधित ग्रामसेवक, सरपंच व जबाबदार व्यक्तींवर नियमानुसार कारवाई करावी, अशी मागणी तक्रारदारांनी केली आहे.
दरम्यान, या तक्रारीवर पंचायत समिती महागाव येथे प्राप्ती नोंद करण्यात आली असून, संबंधित विभागाकडून पुढील कार्यवाहीकडे लक्ष लागले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button