शहर

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०१ व्या जयंतीनिमित्त पुसदमध्ये भव्य शोभायात्रेचे आयोजन


महागाव प्रतिनिधी संजय नागरगोजे

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०१ व्या जयंतीनिमित्त पुसद शहरात दरवर्षीप्रमाणे यंदाही भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. जयंती उत्सव मोठ्या उत्साहात आणि पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यासाठी विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
शनिवार, दि. ३१ मे रोजी सायंकाळी ४ वाजता श्री शिवाजी विद्यालय, पुसद येथून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून शोभायात्रेला प्रारंभ होणार आहे. यामध्ये राजमाता अहिल्यादेवींची पालखी, बाळूमामांच्या झोपडीचा देखावा, पुरुष व महिलांच्या भव्य वारकरी दिंड्या, बिरोबाची नयनरम्य झाकी, पारंपरिक वाघ्या-मुरळी नृत्य, सुप्रसिद्ध बंजारा डफडे वादन, वीर मल्हाररावांचे घोडेस्वार व सैनिक, पारंपरिक सनई-चौघडा तसेच पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या जीवनकार्याचा पट उलगडणारी विविध दृश्ये हे मुख्य आकर्षण असणार आहे.
विशेष म्हणजे संपूर्ण शोभायात्रा डीजे विरहित असून पारंपरिक व धार्मिक वातावरणात पार पडणार आहे.
शोभायात्रेचा मार्ग श्री शिवाजी विद्यालय येथून सुरू होऊन छत्रपती शिवाजी महाराज चौक, नेताजी सुभाषचंद्र बोस चौक, कापड लाईन मार्ग, नगीना चौक, महात्मा गांधी चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक मार्गे वसंतराव नाईक चौक येथे समाप्त होईल.


शोभायात्रेच्या सांगतेनंतर विरंगुळा ज्येष्ठ नागरिक भवन, शनी मंदिराच्या मागे अहिल्याप्रेमींसाठी महाप्रसाद व भोजन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
या कार्यक्रमाला सर्व समाजबांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून जयंती उत्सव उत्साहात साजरा करावा, असे आवाहन जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष शामराव भाऊराव पाटील (मस्के) यांनी केले आहे.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा. सुरेश गोफणे, सुभाष बोडखे, प्रकाश पाटील वायकुळे, अशोक मस्के, कैलास गावकर, प्रभाकरराव मस्के, वैभव पाटील, प्रकाश नेमायेते, प्रमोद ढाले, सचिन खटके, सचिन गडदे, राहुल मस्के, राजूभाऊ जामकर, प्रकाश टेकाळे, मारुती टेंगल, गजानन भडंगे, बाळासाहेब करे, सुजाता जटाळे, वनिता मारकड, शितल खोरणे, छाया जामकर यांच्यासह अनेक समाजबांधव परिश्रम घेत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button