हा वॉर्ड माझे घर आणि मी या कुटुंबाचा सदस्य” – नगरसेवक मो. मुजतबा मतीन यांचा जिव्हाळा; वॉर्ड १४ मध्ये पाणी चालू!

हिमायतनगर तालुका (प्रतिनिध शेख खयुम): शहरातील वॉर्ड क्रमांक १४ मधील पाणी टंचाईचा प्रश्न अखेर निकाली निघाला आहे. गेल्या काही दिवसांपासून या भागातील नागरिकांना पाण्यासाठी मोठी कसरत करावी लागत होती. ही बाब लक्षात घेऊन नगरसेवक मो. मुजतबा मतीन यांनी प्रशासकीय पातळीवर वेगवान हालचाली केल्या आणि नवी मोटर बसवून आज पाणी चालू केले.
जनतेशी जोडले रक्ताचे नाते नव्या मोटरचे काम पूर्ण झाल्यानंतर नागरिकांशी संवाद साधताना नगरसेवक मो. मुजतबा मतीन कमालीचे भावूक झाले होते. ते म्हणाले की, “निवडणूक आणि राजकारण बाजूला ठेवा, पण हा वॉर्ड म्हणजे माझ्या घराचा एक अविभाज्य हिस्सा आहे. इथल्या प्रत्येक नागरिकाच्या सुखात आणि दुःखात मी त्यांच्या कुटुंबाचा एक सदस्य म्हणून उभा आहे. जोपर्यंत मी आहे, तोपर्यंत माझ्या घरच्यांना (वॉर्डातील जनतेला) कोणत्याही समस्येचा सामना करू देणार नाही.”
नेतृत्वाचा खंबीर पाठिंबा हे जनहिताचे काम काँग्रेस अल्पसंख्याक विभागाचे नांदेड जिल्हा उपाध्यक्ष फेरोज खान यांच्या खंबीर नेतृत्वाखाली आणि मार्गदर्शनाखाली पूर्णत्वास नेण्यात आले. त्यांच्या मार्गदर्शनामुळेच वॉर्डातील विकासकामांना मोठी गती मिळत असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
मान्यवरांची उपस्थिती या आनंदाच्या प्रसंगी वॉर्डातील प्रमुख नागरिक रियाज भाई, कमलवाले शेख अजीस बाबू भाई, यांच्यासह मोठ्या संख्येने स्थानिक रहिवासी उपस्थित होते. पाणी चालू होताच महिलांनी आणि नागरिकांनी समाधान व्यक्त करत फेरोज खान आणि मुजतबा मतीन यांचे आभार मानले आहेत.



