शहर

उमरखेड शहरात शिवजयंती शाही थाटात साजरी

छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयघोषाने दुमदुमलीऔदुंबर नगरी
आकर्षक देखावे व चित्त थरारक प्रात्यक्षिके ,भजनी मंडळीच्या सहभागाने शिवप्रेमींचे लक्ष वेधले

सहसंपादक शेख मुजाहिद

उमरखेड :महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 396 व्या जयंतीनिमित्त शहरातील बाजार समिती प्रांगणातून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भव्यप्रतिमेची सजलेल्या वाहन रथातून आकर्षक देखावे ,लेझीम पथके , संगीत भजनी ,भारुडी भजनी , ढोल ताशांच्या निनादात शहरातील प्रमुख मिरवणूक मार्गाने शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने लाडक्या राजाच्या प्रतिमेची भव्य शोभायात्रा काढण्यात आली .सदर शोभा यात्रेतील आकर्षक देखावे चित्त थरारक प्रात्यक्षिक व बेलखेड येथील भजनी मंडळ, लेझीम पथकांनी शिवप्रेमीच्या डोळ्यांचे अक्षरशः पारणे फिटले .या शोभायात्रेत शहरातील गोपिकाबाई गावंडे कॉलेजचे लेझीम पथक ,जिल्हा परिषद माध्यमिक मुलांची शाळेचे लेझीम पथक , नागापूर ( प ) शालेय मुलींची लेझीम पथके महात्मा ज्योतिबा फुले शाळेचे ढोल ताशा पथक, बंजारा नृत्य , बिरसा मुंडा आदिवासी नृत्य पथक ,एस एम ए कराटे क्लासेस पथकाची चित्त थरारक प्रात्यक्षिके ,सजविलेली अश्व अशा देखाव्यांनी शिवप्रेमींचे लक्ष घेतले होते .या थाटामाटात निघालेल्या दिमाखदार शोभायात्रेत शहरातील व तालुक्यातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते .शिवजयंती महोत्सव समितीचे अध्यक्ष गजानन देशमुख भैय्या पवार, वसंतराव देशमुख, सुरेश कदम, गुलाबराव सुर्यवंशी व इतर त्यांचे सहकारी तसेच भाजपा जिल्हा समन्वयक नितीन भुतडा , आमदार किसन वानखेडे,नगराध्यक्ष तेजश्री जैन,काँग्रेस नेते नंदकिशोर अग्रवाल,राम देवसरकर ,दत्तराव शिंदे , ॲड .संतोष जैन , शिंदे शिवसेना चितांगराव कदम प्रविण पाटील मिराशे संतोष जाधव ,कृष्णा पाटील देवसरकर,संदीप ठाकरे,अजय नरवाडे यांच्यासह विविध राजकीय पक्षांचे नेते व कार्यकर्ते सहभागी झाले होते. त्याच प्रमाणे शिवजयंती मोहोत्सव विसर्जनाच सायंकाळी च्यार वाजता विसर्जन करण्यात आले पोलीस प्रशानना ने शिवजयंती मोहोत्सव समितीने अथक परिश्रम घेतले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button