Uncategorized

महागाव नगरपंचायत चा ढसाळ कारभार कारभारामुळे पंतप्रधान आवास योजनेचा शिल्लक असलेला निधी 2 कोटी 39 लाख गेला वापस!


महागाव प्रतिनिधी संजय नागरगोजे
महागाव नगरपंचायत हद्दीत पंतप्रधान आवास योजनेचे पहिल्या डीपीमध्ये 275 लाभार्थी निवडण्यात आले त्यामध्ये 1 कोटी 64 लाख 4 रुपये निधी खर्च झाला परंतु 2 व 3 डीपी मध्ये 590 लाभार्थी पंतप्रधान आवास योजनेचे घरकुल मंजूर झाले.त्या कामाला केंद्र सरकारने 3 कोटी 28 लाख निधी उपलब्ध करून दिला.त्यामध्ये 98 लाख निधी वाटप करण्यात आला. परंतु कर्मचाऱ्यांच्या गलतन कारभारामुळे व काँग्रेस पक्षाच्या सत्ताधारी पक्षामुळे 2 कोटी 39 वापस गेले .प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी अमोल गाडबरे यांच्याकडील पदभार काढून त्या ठिकाणी काम करणारा व्यक्ती राजनकर यांची निवड केली पण अध्यक्षाच्या हेड खोड पणामुळे त्या कर्मचारी चा चार्ज देण्यात आला नाही. 2 व 3 डीपीत 590 एवढे घर मंजूर झाले होते. परंतु नगरपंचायत च्या ढीसाळ कारभारामुळे व अपक्ष नगराध्यक्ष झाल्यामुळे सत्ताधारी पक्षात फुट पडल्यामुळे तसेच सभापती निवड बहिष्कार टाकल्यामुळे अध्यक्ष पद धोक्यात आले आहे. कोणतीही विकासाचे कामे होत नसून महागाव शहरात घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. विरोधी पक्ष नगरसेवक यांच्या वार्डात कोणतीही विकासाचे कामे होऊ देत नाही. त्यामुळे नगरपंचायत मध्ये ताळमेळ बसत नाही घनकचर्याचे टेंडर मंजूर होऊन सुद्धा ठेकेदाराने कोणते काम सुरू केले नाही .त्यामुळे पावसाळ्यात महागाव शहराला घाणीचे स्वरूप आले आहे. त्यामुळे नगरपंचायत मधील सत्ताधारकांवर नाराजीचा सूर असल्याचे दिसून आले. त्यामुळे नगरपंचायत चा कारभार ढासळलेला आहे .पंतप्रधान घरकुल योजनेचे काम नागरिकांनी सुरू केले पण निधी वापस गेल्यामुळे अधुरे आहे. त्याला जबाबदार असलेल्या कर्मचारी यांना नियोजन करता आले नाही म्हणून ही परिस्थिती निर्माण झाली .काही लाभार्थी यांनी बांधकाम करून सुद्धा त्यांना एकही हप्ता मिळाला नाही. केंद्र शासनाने नगरपंचायत विभागाला पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत 2 व 3 डीपी साठी 3 कोटी 28 लाख निधी उपलब्ध करून दिला होता. परंतु नगरपंचायत च्या अशा ढिसाळ कारभार मुळे 2 कोटी 39 शिल्लक असलेला निधी वापस गेला माजी उपाध्यक्ष भारतीय जनता पार्टी चे नगरसेवक सुरेश नरवाडे यांनी सभागृहा त आवाज उठवला पण विरोधक असल्यामुळे त्यांचे कोणीही ऐकले नाही .अखेर ठराव ना मंजूर झाल्यामुळे नगरपंचायत चा कारभार चव्हाट्यावर आला आहे .घरकुल लाभार्थ्यांना लवकरात लवकर वापस गेलेला निधी उपलब्ध करून द्यावा अन्यथा लाभार्थी आंदोलन करायच्या तयारीत आहे. असे सुरेश नरवाडे पाटील यांनी आमच्या प्रतिनिधीला सांगितले

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button