Uncategorized
एकादशीनिमित्त महाराष्ट्रात संपूर्ण देशी विदेशी दारूचे दुकान बंद परंतु महागावात खुलेआम अवैध देशी विक्री सुरू बीड जमादार अवैध देशी दारूच्या दुकानावर कारवाई करतील का?

महागाव प्रतिनिधी संजय नागरगोजे
महागाव शहरात अवैध देशी दारू विक्री सुरू असल्यामुळे मुलांची व्यसनाचे प्रमाण वाढले आहे .आज महागाव शहरात एकादशी निमित्त देशी दारूचे दुकान व वाईन बार बंद असल्यामुळे देशी दुकानदारांनी महागाव शहरात 15 ते 20 अवैध देशी विक्री काउंटर सुरू केले आहे .ते तातडीने बंद करावे अशी गावातील नागरिकांची मागणी आहे .महागाव शहरात मुलांना व्यसनमुक्त करणे गरजेचे आहे.अशा परिस्थितीत जमादार त्यांच्यावर कारवाई का ? हा प्रश्न पडला आहे. ठाणेदार यांनी जातीने लक्ष देऊन अवैध देशी दारू विक्री बंद करावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्यांनी केली आहे.



