Uncategorized

गुंज येथे 52 पत्ता जुगार अड्ड्यावर एलसीबीचा छापा; 55 हजार 960 रुपयांचा मुद्देमाल जप्त


महागाव प्रतिनिधी : संजय नागरगोजे
महागाव पोलीस ठाणे हद्दीतील मौजे गुंज येथे सुरू असलेल्या 52 पत्ता जुगार अड्ड्यावर स्थानिक गुन्हे शाखा (एलसीबी) यवतमाळच्या पथकाने धाड टाकून कारवाई केली. या कारवाईत एकूण 55 हजार 960 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यवतमाळ जिल्ह्यातील अवैध धंद्यांवर आळा घालण्यासाठी पोलीस अधीक्षक कुमार चिंथा यांच्या निर्देशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पथक गस्त घालत असताना त्यांना गोपनीय माहिती मिळाली. दोन वर्षापासून सुरू असलेले दिव्याच्या अड्डावर कारवाई करण्याकरता पथक नियुक्ती त्यानुसार 13 जून 2026 रोजी गुंज येथील श्रीधर पुंजाराव जोरोळे यांच्या कॉम्प्लेक्सच्या पाठीमागील मोकळ्या जागेत काही व्यक्ती पैशांची हारजित लावून 52 पत्ता जुगार खेळत असल्याचे निदर्शनास आले.
त्यानंतर एलसीबीच्या पथकाने घटनास्थळी छापा टाकून निरंजन नागोराव यादव, श्रीधर पुंजाराव जोरोळे, संतोष किसन राठोड, नागोराव विठ्ठल दुपारे, दिगांबर दत्तात्रय आसोले, राजेंद्र पांडुरंग कांबळे व सुशील भगवान अखाडे यांना ताब्यात घेतले.
कारवाईदरम्यान आरोपींकडून रोख रक्कम, जुगार साहित्य तसेच मोबाईल फोन असा एकूण 55 हजार 960 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी महागाव पोलीस ठाण्यात महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्यान्वये कलम 12(अ) अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक कुमार चिंथा, अपर पोलीस अधीक्षक अशोक थोरात व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सतीश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button