आकसापोटी दाखल केलेले गुन्हे मागे घ्या शिंदे सेनेचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

सहसंपादक शेख मुजाहिद
उमरखेड :तालुक्यातील अवैध धंदे बंद करावे यासाठी जिल्हा पोलीस अधिक्षकांकडे तक्रार केल्याचा राग बाळगून उमरखेड ठाणेदारांनी युट्यूब चॅनलच्या संपादकावर आकसापोटी दाखल केलेले गंभीर स्वरुपाचे गुन्हे मागे घ्यावे , अशा आशयाचे निवेदन शिवसेना (शिंदे ) पक्षाच्या वतीने राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना उपविभागिय अधिकाऱ्यांमार्फत पाठविले आहे .
उमरखेड येथील धाडस oo7 या युट्यूब चॅनलचे संपादक अमित देशमुख हे दि 12 मार्च रोजी रात्री 9 ते साडेनऊ वाजता पोलीस स्टेशनमधून एका तक्रारकर्त्याने त्यांना फोनवर तेथे बोलावल्यामुळे कोणत्या प्रकारची घटना आहे हे जाणून घेण्यासाठी पत्रकार या नात्याने तेथे जाऊन विचारणा करीत असतांना त्यांना पाहताच तेथे हजर असलेले ठाणेदार शंकर पांचाळ यांचा पारा चढण्याचे कारणही तसेच आहे , कारण याच अमितने दि 10 मार्च रोजी जिल्हा पोलीस अधिक्षक हे उमरखेड पोलीस स्टेशनला आलेले असतांना त्यांच्याकडे तालुक्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी उमरखेड पोलीस स्टेशनचे समर्थन लाभलेले अवैध दारू विक्री, गांजा , गुटखा, जुगार इत्यादी अवैध धंदे बंद करावे यासाठी त्यांच्याकडे तक्रार केली होती . तसेच आपल्या युट्यूब चॅनल मार्फत अवैध धंद्यांविषयी अनेक वृत्त प्रसारित केले . याचा राग बाळगून असलेल्या ठाणेदारांनी पोलीस स्टेशनला आलेल्या अमित देशमुख विरुद्ध शासकिय कामात अडथळा , जातिय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न , पोलिसांविषयी अप्रितीची भावना निर्माण करण्याचा प्रयत्न असे गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल करून चिडलेल्या ठाणेदारांनी अधिकाराचा वापर करून आपला राग व्यक्त केला . या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन वरिष्ठ अधिकाऱ्यांमार्फत निष्पक्ष चौकशी करून अमित देशमुखवरील गुन्हे मागे घ्यावे व त्यांना न्याय मिळवून द्यावा अशा आशयाचे निवेदन उपविभागिय अधिकारी यांचे मार्फत राज्याचे मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांना शिवसेना शिंदे पक्षाच्या वतीने यवतमाळ जिल्हासह संपर्क प्रमुख चितांगराव कदम , शहर प्रमुख ॲड . संजीवकुमार जाधव, तालुका प्रमुख प्रविण पाटील मिराशे , विधानसभा समन्वयक दत्तदिगंबर वानखेडे तालुका समन्वयक रविकांत रुडे , विधानसभा संघटक संतोष जाधव , कपील चव्हाण , जेष्ठ शिवसैनिक कैलास कदम , सपना चौधरी , , प्रा डॉ प्रदीप इंगोले यांच्यासह शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी दिले आहे .



