हिमायतनगर: प्रभाग १४ मधील पाणीटंचाईवर मात; नगरसेवक प्रतिनिधी फेरोज खान यांचा शब्द – “जनतेच्या समस्या सोडवण्यास मी कटिबद्ध”

हिमायतनगर (तालुका प्रतिनिधी शेख खयुम):
भीषण उन्हाळा आणि वाढती पाणीटंचाई लक्षात घेता, हिमायतनगर शहरातील वार्ड क्र. १४ मध्ये नवीन बोअरवेल (बोअर) मारण्याचे काम यशस्वीरीत्या पूर्ण करण्यात आले आहे. या उपक्रमामुळे प्रभागातील महिला व नागरिकांचा पाण्याचा गंभीर प्रश्न सुटण्यास मोठी मदत होणार आहे.
याप्रसंगी शहराचे लोकनियुक्त नगराध्यक्ष शेख रफिक शेठ यांची प्रमुख उपस्थिती होती. त्यांच्यासोबतच अल्पसंख्याक जिल्हा उपाध्यक्ष तथा नगरसेवक प्रतिनिधी फेरोज खान, शेख इलियास खुरेशी श्री. मेरगेवाड जी, रियाज भाई कमला वाले व वार्डातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी बोलताना फेरोज खान यांनी जनतेला आश्वासित केले की, “माझ्या प्रभागातील नागरिकांना कोणत्याही कामासाठी त्रास होऊ देणार नाही. पाण्याचा प्रश्न असो, नाल्यांची स्वच्छता असो वा रस्त्यांची कामे; जनतेच्या प्रत्येक समस्येवर मी स्वतः लक्ष घालून ती सोडवेन. विकासकामांत प्रभाग १४ ला मागे पडू देणार नाही.”
लोकप्रतिनिधींनी दाखवलेल्या या तत्परतेमुळे आणि पाणीटंचाईवर केलेल्या प्रभावी उपाययोजनेमुळे वार्ड क्र. १४ मधील रहिवाशांनी प्रशासनाचे आणि नगराध्यक्षांचे आभार मानले आहेत.



