कोदंरी येथे ग्राम विकास योजने अंतर्गत पाणी अडवा पाणी जिरवा मोहिम

महागाव: प्रतिनिधी संजय नागरगोजे
तालुक्यातील कोदंरी येथे आज दिनांक २९ डिसेंबर रोजी सोमवारला ग्राम समृद्धी योजनेच्या माध्यमातून ग्रामपंचायत लोकप्रतिनिधी व जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा कोदंरी यांच्या संयुक्ताने वाकान कोदंरी शिवारात वाहत असलेल्या दुधगंगा नदीपात्रात जिल्हा परिषद मराठी शाळा सर्व शिक्षकवृंद व विद्यार्थ्यासह वनराई बंधारा बांधण्यात आला हे बंधारे बांधण्याचे उद्दिष्ट म्हणजे येणाऱ्या काळात पाणी टंचाई लक्षात घेता पाणी अडवा पाणी जिरवा ही मोहीम कोदंरी येथील दुधगंगा नदीपात्रात राबविण्यात आली यावेळी ग्रामपंचायत सदस्या अनुनिया शेख बिबन, ग्रामपंचायत कर्मचारी महेंद्र चव्हाण,राजु घड्याळे, जिल्हा परिषद शाळा कोदंरी येथील विद्यार्थी व शिक्षक वर्ग उपस्थित होते.या मोहिमेकरीता मार्गदर्शन म्हणून श्री विपुल भवरे ग्राम विकास अधिकारी, श्री सतीश गेडाम यांच्या सह सरपंच रवि पवार यांचे सहकार्य लाभले.



