महागाव पंचायत समिती एमबीचे रेकॉर्ड लंपास झाले प्रकरणात चौकशी कमिटी स्थापन !दैनिक महासागर वृत्तपत्राची दखल!

महागाव, प्रतिनिधी संजय नागरगोजे
महागाव तालुक्यातील वाकोडी ग्रामपंचायत येथील रोजगार सेवक (ठेकेदार) आणि सरपंच यांनी गावातील सिमेंट रस्त्याचे काम न करता बोगस एम.बी. रेकॉर्ड महागाव पंचायत समितीला मंगळवारी 7 ऑक्टोबर रोजी सादर करण्यात आले.
आता हे प्रकरण चांगलेच अंगलट येणार हे लक्षात आल्याने नऊ ऑक्टोबर रोजी गुरुवारी गटविकास अधिकारी कार्यालयातील खोटे एमबी अधिकाऱ्यांच्या एकाच शाईच्या पेनद्वारे खोट्या स्वाक्षऱ्या असल्याचे प्रकरणाचा आत्ताभांडाफोड होणार असल्याने या प्रकरणात सामील असणाऱ्या आणखी इतरांना स्पष्ट लक्षात आले गुरुवार दि. 9 ऑक्टोबर रोजी महागाव पंचायत समिती मधून खोट्या अधिकाऱ्याच्या खोट्या सह्या करून दाखल केलेले प्रकरण अंगलट येईल म्हणून ग्रामसेवक पाटील यांनी संपूर्ण प्रकरणाची फाईल बी डि ओ ला दाखवायचे आहे .म्हणून कार्यालयातून घेऊन गेले या अगोदर बोगस मस्टर तयार करून डुप्लिकेट सह्या मारून शासनाचा निधी हडप केला आहे . ते सुद्धा चौकशीत उघड होईल , या गंभीर प्रकरणाची दखल घेऊन दिनांक १०-१०-२५ रोजी दैनिक महासागर वृत्तपत्रात बातमी प्रकाशित होताच महागाव गटविकास अधिकारी यांनी वाकोडी प्रकरणात तात्काळ चौकशी समिती नेमण्यात आली. त्या चौकशी समितीमध्ये विस्तार अधिकारी बांधकाम विभाग चे जेई व इतर दोन कर्मचारी यांची कमिटी नेमून मंगळवारी चौकशी करून चौकशी अहवाल सादर करण्याचे पत्र दिले त्या चौकशी अहवालामध्ये सरपंच सचिव ठेकेदार व जो कोणी दोषी आढळल्यास संबंधितांवर फौजदारी कारवाई करण्यात येईल असे गटविकास अधिकारी कदम साहेब यांनी आमच्या प्रतिनिधी जवळ प्रतिक्रिया व्यक्त केली.



