Uncategorized

उमरखेड तालुक्यात कोपरा–चातारी रस्त्याच्या कामावर प्रश्नचिन्ह; निकृष्ट काम करून बिल काढण्याचा ठेकेदाराचा डाव?


महागाव प्रतिनिधी संजय नागरगोजे
उमरखेड तालुक्यातील कोपरा ते चातारी या अत्यंत महत्त्वाच्या रस्त्याचे काम तब्बल दोन वर्षांच्या विलंबानंतर सुरू करण्यात आले असले तरी, हे काम दर्जाहीन व घाईघाईत करण्यात येत असल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे. ठेकेदार व संबंधित अधिकाऱ्यांच्या संगनमताने केवळ थातूरमातूर काम करून बिल काढण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे.
कोपरा–चातारी हा रस्ता रहदारीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा असून, उंबरखेड चे मोठे पुढारी चातारी गावात राहतात त्यामुळे चातारी गावातील नागरिक मोठ्या प्रमाणावर उमरखेडला ये-जा करण्यासाठी कोपरा मार्गाचा वापर करतात. मात्र, ब्राह्मणगाव ते चातारी हा रस्ता सध्या अत्यंत खराब अवस्थेत असून, मोठमोठे खड्डे पडल्याने पुढाऱ्यांचे याकडे लक्ष नसल्याचे दिसत आहे. वाहनचालकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे.
या रस्त्याच्या दुरवस्थेकडे लोकप्रतिनिधी व जिल्हा परिषद सदस्यांनी सातत्याने दुर्लक्ष केल्याचा आरोप होत असून, त्यामुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी आहे. येणाऱ्या पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये नवीन नेतृत्व निवडण्याचा विचार नागरिक करीत असल्याचे बोलले जात आहे.
चातारी गावाला अनेक वर्षांपासून दर्जेदार रस्त्यापासून वंचित राहावे लागत आहे. “आमचे आमदार दोन वेळा बदलले, मात्र फक्त तीन किलोमीटरचा रस्ताही दुरुस्त होऊ शकला नाही, ही मोठी शोकांतिका आहे,” अशी भावना गावकरी उघडपणे व्यक्त करत आहेत.
या पार्श्वभूमीवर राजू धात्रक यांनी कोपरा ते चातारी रस्त्याचे काम पारदर्शक पद्धतीने व उच्च दर्जाचे करावे, अशी लेखी मागणी बांधकाम विभागाकडे केली आहे. या तक्रारीवर प्रशासन काय कारवाई करते, याकडे संपूर्ण चातारी व परिसरातील ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button