Uncategorized

मुडाणा बसस्थानकावरील सर्व्हिस रोडवरील अतिक्रमणामुळे प्रवाशांचे हाल!

स्थानिक हॉटेल व्यवसायिक आणि वाहनधारकांकडून उघडपणे अतिक्रमण

महागाव प्रतिनिधी संजय नागरगोजे

महागाव तालुक्यातील मुडाणा बसस्थानक परिसरात नागपूर–तुळजापूर हायवेवरील उडाणपुलाखालील सर्व्हिस रोडवर सुरू असलेल्या अतिक्रमणामुळे प्रवाशांना, वाहनचालकांना तसेच शिक्षणासाठी महागावला जाणाऱ्या विद्यार्थ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

अजय गणेश वानखेडे, दिनेश तानाजी ठाकरे आणि राहुल नंदकुमार वानखेडे या गावातील रहिवाशांनी या संदर्भात सा.बां. उपविभाग, महागाव येथील उपविभागीय अभियंत्यांकडे लेखी तक्रार दाखल केली आहे. त्यांनी आपल्या निवेदनात नमूद केले आहे की, उडाणपुलाखालील सर्व्हिस रोडवर काही हॉटेल व्यवसायिक व खाजगी वाहनधारकांनी बेकायदेशीररीत्या जागा व्यापली आहे.

या अतिक्रमणामुळे बसस्थानक परिसरात वाहतूक कोंडी होत असून प्रवाशांना उभे राहण्यासाठीसुद्धा जागा उरत नाही. विशेष म्हणजे, या मार्गाने शिक्षणासाठी महागावला जाणाऱ्या विद्यार्थी, विशेषतः विद्यार्थिनी, यांना सर्वाधिक अडचणींचा सामना करावा लागत आहे.

सदर अतिक्रमण तातडीने हटवावे, अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.

स्थानिक नागरिकांच्या या तक्रारीनंतर प्रशासन कोणती कार्यवाही करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button