नागपूर–तुळजापूर महामार्गावर नांदगव्हाण घाटात अपघात ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरला ट्रकची धडक; सुदैवाने जीवितहानी नाही

महागाव प्रतिनिधी : संजय नागरगोजे
महागाव तालुक्यातील नागपूर–तुळजापूर महामार्गावर नांदगव्हाण घाट परिसरात रविवारी (दि. १४ डिसेंबर) रात्री सुमारे १० वाजण्याच्या सुमारास अपघात घडला. उतारावर न्यूट्रल अवस्थेत येणाऱ्या एका ट्रकवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने रस्त्याने जाणाऱ्या ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर-ट्रॉलीला ट्रकने जोरदार धडक दिली.
या अपघातात ट्रॅक्टर-ट्रॉलीचे नुकसान झाले असून मोठ्या प्रमाणात ऊस रस्त्यावर विखुरला गेला. मात्र सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.
अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत मदतकार्य केले. या घटनेमुळे काही काळ महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. संबंधित यंत्रणांनी तत्काळ कारवाई करत अपघातग्रस्त वाहने बाजूला काढून वाहतूक सुरळीत केली. शेतकऱ्यांच्या ऊस पिकाची उसाची नुकसान भरपाई नॅचरल शुगर फॅक्टरी द्यावी अशी मागणी केली आहे



