Uncategorized

हिवरा येथे बायपास नसल्याने अपघातांची मालिका; नॅशनल हायवे प्रशासन जबाबदार कोण?


महागाव प्रतिनिधी संजय नागरगोजे
तुळजापूर–नागपूर राष्ट्रीय
महामार्गावर हिवरा (ता. महागाव) येथे बायपासचे काम रखडल्यामुळे वारंवार अपघात होत असून नागरिकांच्या जीवाशी खेळ सुरू आहे. ९ जानेवारी रोजी सायंकाळच्या सुमारास माहूर येथून देवीचे दर्शन घेऊन हिंगोलीकडे जाणाऱ्या टेम्पोला भरधाव ट्रकने जबर धडक दिली, या अपघातात ८ ते १० प्रवासी जखमी झाले आहेत.
अपघाताची माहिती मिळताच महागाव पोलीस ठाण्याचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. जखमींना तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून एका जखमीची प्रकृती चिंताजनक असल्याने माहूर येथील रुग्णालयात हलविण्यात आले.
तुळजापूर–नागपूर हा राष्ट्रीय महामार्ग घोषित होऊनही हिवरा येथे अद्याप बायपासचे काम सुरू न झाल्याने अपघातांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. विशेष म्हणजे बायपास होणार त्या ठिकाणी रस्ता अरुंद करण्यात आला असून, भरधाव येणाऱ्या वाहनांचे नियंत्रण सुटत असल्याने अपघात होत आहेत. या ठिकाणी आतापर्यंत १५ ते २० वेळा अपघात झाल्याची नोंद असल्याचे स्थानिक नागरिक सांगतात.
महत्त्वाचे म्हणजे महामार्गावर कोणतीही सुरक्षा व्यवस्था, साइन बोर्ड, वळण दर्शविणारे फलक किंवा रिफ्लेक्टर नसल्याचे स्पष्टपणे दिसून येते. असे असतानाही दोन टोल नाके सुरू असून वसुली मात्र नियमित केली जात आहे, यावर नागरिकांतून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
“रस्ता न करता टोल वसुली कशासाठी?” असा सवाल उपस्थित होत असून, या अपघातांना नॅशनल हायवे प्रशासन जबाबदार कोण? असा प्रश्न नागरिक विचारत आहेत. वारंवार निवेदने देऊनही संबंधित यंत्रणा अद्याप जागी न झाल्याचा आरोप होत आहे.
हिवरा येथे तात्काळ बायपास रस्ता पूर्ण करावा, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा नागरिकांनी दिला असून आंदोलनाची तयारी सुरू असल्याचे चित्र दिसून येत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button