Deprecated: htmlspecialchars(): Passing null to parameter #1 ($string) of type string is deprecated in /home/maha21/umarkhedvarta.in/wp-includes/formatting.php on line 4802
शहर

आमदार दहीहंडीच्या नादात, ग्रामीण रुग्णालय रामभरोसे!
उमरखेड-महागाव मतदारसंघातील आरोग्य व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह; आमदार किसन वानखडे साहेब, जागे व्हा!


Deprecated: htmlspecialchars(): Passing null to parameter #1 ($string) of type string is deprecated in /home/maha21/umarkhedvarta.in/wp-includes/formatting.php on line 4802


महागाव, प्रतिनिधी : संजय नागरगोजे
दहीहंडी आणि आगामी यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणुकीच्या राजकारणात आमदार व्यस्त असताना उमरखेड-महागाव मतदारसंघातील महागाव ग्रामीण रुग्णालय मात्र रामभरोसे सुरू असल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे. ग्रामीण भागातील सर्वसामान्य नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर असताना लोकप्रतिनिधींचे याकडे दुर्लक्ष का, असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित होत आहे.
महागाव ग्रामीण रुग्णालयातील तब्बल १६ कर्मचारी पदे रिक्त असल्याची माहिती हे पत्र समोर आली आहे. विशेष म्हणजे ही पदे कॉन्ट्रॅक्ट बेसवर अकोला येथून भरण्याची प्रक्रिया करता येऊ शकते, असे असतानाही विधानसभेचे सदस्य म्हणून आमदार किसन वानखडे यांना ही साधी प्रक्रिया मार्गी लावता येत नाही का, असा सवाल नागरिक करीत आहेत.
‘आमदार किसन वानखडे साहेब, जागे व्हा!’ अशी मागणी आता नागरिकांकडून होत आहे. मतदारसंघात शासनाच्या माध्यमातून आरोग्य सुविधांसाठी निधी व विविध योजना उपलब्ध असताना प्रत्यक्ष रुग्णालयात कर्मचारीच उपलब्ध नसतील, तर या सुविधांचा फायदा सामान्य जनतेला कसा मिळणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
महागाव ग्रामीण रुग्णालयात दररोज प्रसूतीसाठी महिला रुग्ण येतात. मात्र आवश्यक मनुष्यबळ आणि सुविधा अपुऱ्या असल्याने रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना अडचणींचा सामना करावा लागत असल्याच्या तक्रारी आहेत. रुग्णालयात चालकाचे पदही नसल्याने आपत्कालीन परिस्थितीत रुग्णवाहिका सेवेसमोरही प्रश्न निर्माण होऊ शकतो.
काही दिवसांपूर्वी याच ग्रामीण रुग्णालयात डॉक्टरांसोबत मारहाणीची गंभीर घटना घडली. या घटनेनंतर डॉक्टरांनी आंदोलन केले, कामबंद आंदोलन करण्यात आले आणि प्रकरण जिल्हाभर चर्चेत आले. एवढी गंभीर घटना घडल्यानंतरही आमदारांनी महागाव ग्रामीण रुग्णालयाला भेट देऊन परिस्थितीची पाहणी का केली नाही, असा सवाल नागरिक उपस्थित करीत आहेत.
एकीकडे राजकीय कार्यक्रम, दहीहंडी आणि निवडणुकीची तयारी; तर दुसरीकडे ग्रामीण भागातील आरोग्य व्यवस्था कर्मचाऱ्यांअभावी ऑक्सिजनवर! अशी परिस्थिती उमरखेड-महागाव मतदारसंघात निर्माण झाली असल्याची भावना नागरिक व्यक्त करीत आहेत.
लोकप्रतिनिधी म्हणून आमदार किसन वानखडे यांनी या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष देऊन महागाव ग्रामीण रुग्णालयातील १६ रिक्त कर्मचारी पदे तातडीने भरण्यासाठी शासनस्तरावर पाठपुरावा करावा आणि रुग्णालयातील आवश्यक आरोग्य सुविधा सक्षम कराव्यात, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून होत आहे.


Deprecated: htmlspecialchars(): Passing null to parameter #1 ($string) of type string is deprecated in /home/maha21/umarkhedvarta.in/wp-includes/formatting.php on line 4802

Deprecated: htmlspecialchars(): Passing null to parameter #1 ($string) of type string is deprecated in /home/maha21/umarkhedvarta.in/wp-includes/formatting.php on line 4802

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button