उमरखेड महागाव मतदारसंघाचे आमदार सर्व अधिकाऱ्यासमक्ष शेतकऱ्यांचा जनता दरबार लावतील का?(अधिकारी व कर्मचारी यांना शेतकरी त्रस्त !)

महागाव तालुका वार्तापत्र संजय नागरगोजे
महागाव सर्व शासकीय कार्यालयामध्ये तसेच तहसील मध्ये शेतकऱ्याला न्याय मिळत नसल्यामुळे महागाव परिसरात अनेक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहे .नुकत्याच दहिसावळी येथे दोन आत्महत्या एकाच गावात झाल्या .त्या ठिकाणी तहसीलदार अभय मस्के व इतर शासकीय अधिकारी यांची साधी भेट दहिसावळी येथे शेतकऱ्यांच्या घरी दिली नाही .व त्यांचे कुटुंबाला का आत्महत्या झाली याची साधी विचारपूस सुद्धा केली नाही . त्यांच्या समस्या काय आहे हे सुद्धा ऐकायला वेळ नाही . शेतकऱ्याच्या लाईनची समस्या , नदीकाठील जमिनी खरडून गेलेल्या जमिनी बाबतची समस्या, शेतकऱ्यांना अनुदानित बियाणे बाबतची समस्या, एससी एसटी शेतकऱ्यांना अनुदान मिळणाऱ्या शेत अवजारे यांची माहिती, शेतकऱ्यांच्या घरकुलच्या समस्या, शेत पिकावर 100% अनुदानात मिळणारे औषधी हे कोणी सांगत नाही.शेतकऱ्यांची पांदन रस्त्याचे प्रकरण प्रलंबित आहे . आत्महत्या करणारे शेतकरी यांच्या कुटुंबाला आर्थिक मदत मिळाली नाही, डोंगरगाव येथे धरणामध्ये वीज पडून 40 ते 50 जनावर दगावली त्यांना सुद्धा शंभर टक्केआर्थिक सहाय्य रक्कम मिळाली नाही . अशावेळी घटनेच्या ठिकाणी तहसीलदार व आमदार यांनी बोट द्वारे फिरून परिसरामध्ये पाहणी केली व त्याचे फोटो काढून प्रसिद्धी माध्यमांना देऊन प्रसिद्धी करण्यात आली .फक्त फोटो सेशन करणे व प्रसिद्धी मिळून घेणे हेच चित्र महागाव मतदार संघात पाहायला मिळत आहे. महागाव तालुक्याच्या ठिकाणी कोणतेही कर्मचारी हेडक्वार्टरला राहत नाही .हे मोठी शोकांतिका आहे.ग्रामसेवक, पटवारी ,मंडळ अधिकारी, कृषी अधिकारी कृषी सहाय्यक हे त्यांच्या हेडकॉटरला थांबत नाही .त्यामुळे शेतकऱ्यांच्या समस्या सोडण्यासाठी कोणताही पर्याय उपलब्ध नाही .त्यामुळे परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात आत्महत्या झाल्या आहे .त्याच्या शासकीय दप्तरीला नोंदी सुद्धा आहेत.याची साधी विचारपूस सुद्धा आमदार करत नाही हे नवल नाही का ? आमदारांनी जनतेला आव्हान करून जनता दरबार सर्व अधिकाऱ्या समक्ष लावावा त्यावेळेस शेतकऱ्याच्या कोणत्या समस्या आहे .हे त्यांना कळेल परिसरामध्ये अतिवृष्टीच्या पावसामुळे व पेनगंगा नदी पात्रात धरणाने पाणी सोडल्यामुळे नदीकाठील वरोडी ,कासाळबेल ,सेवा नगर, आनंदवाडी, हिवरा, शेतकऱ्यांचे लाईनचे पोल पडून आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांची लाईन सुरक्षित सुरू झाली नाही .अशा परिस्थितीत शेतकऱ्यांनी जगावे की मरावे असा पेज निर्माण झाला आहे . शेतकऱ्या विषयी दैनिक महासागर मध्ये तसेच उंबरखेड वार्ता मध्ये मी स्वतःशेतकऱ्यांच्या समस्या प्रसिद्धी माध्यमातून अनेक वेळा प्रसिद्ध केल्यामुळे दहिसावळी येथे एकाच गावात दोन आत्महत्या झाल्या त्यावेळेस लोकप्रतिनिधी व अधिकारी यांनी साधी गावांमध्ये भेट सुद्धा दिली नाही .अशावेळी दैनिक महासागर ने व उमरखेड वार्ता मध्ये मी बातम्या प्रसिद्धी करून शेतकऱ्यांना न्याय मिळावा याकरता सदैव अग्रेषित असलेला दैनिक महासागर वृत्तपत्र मध्ये बातमी प्रसिद्धी झाल्यावर माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दहिसावळी येथे भेट देऊन शासनाची व प्रशासनाची झोप उडवली ,परंतु त्यांच्या दौऱ्यानंतर आमदार यांनी भेट दिली. अशी परिस्थिती महागाव तालुक्याची आहे. महागाव तहसील ची परिस्थिती बिकट असताना उमरखेड मतदार संघाचे आमदार किसन वानखेडे यांनी महागाव तहसील मध्ये आकाश मी भेट देऊन तहसील ची झाडाखालती केली होती त्यावेळी तहसीलदार कार्यालयामध्ये हजर नव्हते. तसेच संपूर्ण शासकीय कार्यालयाची झाडाझडती घेऊन पराते नायब तहसीलदार यांच्याकडून अहवाल तयार करून घेण्यात आला होता. या घटनेची दखल घेऊन सर्व वृत्तपत्रांमध्ये बातम्या प्रसिद्धी करण्यात आल्या. त्यामुळे तहसीलदारावर कारवाई होईल हे निश्चित होते. पण पाणी कुठे मुरले, हे समजले नाही . तहसीलदारावर कोणतीही कारवाई वरिष्ठाखून झाली नाही. व त्यांनी सुद्धा पाठपुरावा केला नाही. त्यामुळे त्यांची गुपित बैठक झाली अशी महागावात चर्चाला उधान आले आहे. महागाव तालुक्यामध्ये जलजीवन मिशन अंतर्गत हर घर नळ योजना मधील पाईपलाईन एक मीटर जमीनतून टाकण्याचे एस्टिमेट असताना चार इंच पाईपलाईन टाकण्यात आली .प्रत्यक्षातील एमबी मधील नोंदी व प्रत्यक्षात पाईपलाईन यामध्ये लाखो रुपयांचा भ्रष्टाचार झाला आहे .महागाव तालुक्यात माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कल्पनेतून तसेच माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून जल जीवन मिशन अंतर्गत प्रत्येक गावात घराघरात शुद्ध पाणी मिळण्याकरता ही योजना आणली होती .त्याकरता 100 कोटी रुपये महागाव तालुक्याला देण्यात आले .परंतु आजपर्यंत कोणत्याही गावात ही योजना सफल झाली नाही . हे विशेष आहे.यामध्ये ठेकेदार अधिकारी व सरपंच हेच मालामाल झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे .याबाबत आमदार व विभागाचे राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांनी महागाव तहसील मध्ये आढावा बैठक घेतली असता या योजनेचा बट्ट्याबोल झालेला आहे . ठेकेदाराला ब्लॅक लिस्टमध्ये टाकू अशी आश्वासन दिले पण त्या आश्वासनाची कोणीही पूर्तता केली नाही. प्रत्येक गावात जल जीवन मिशन तक्रारी करण्यात आल्या तसेच पाण्याचे टाके निकृष्ट दर्जाचे बांधल्यामुळे पोखरी येथील पाण्याची टाकी पडली तसेच संपूर्ण तालुक्यात जलजीवांचे बोगस व अधुरे कामे झाली आहेत. त्यांचे ठेकेदाराने इंजिनिअरच्या संगत मताने अर्धे बिल काढून मोकळे झाले . महागाव तालुक्यात अर्धवट कामे असल्याचे पाणीपुरवठा विभाग जेई यांनी अहवाल दिला आहे. जलजीवन योजनेमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केला आहे. या योजनेला जबाबदार कोण असा सवाल महागाव तालुक्यातील सर्व गावातील नागरिक करीत आहेत.या योजनेचा महागाव तालुक्यात बट्ट्याबोळ झाला आहे. महागाव तालुक्यात सर्व ग्रामपंचायत मध्ये पंधरा वित्त आयोगातून गावाला शुद्ध पाणी मिळण्याकरता आरओ फिल्टर साठी सात लाख रुपये खर्च करण्यात आला. त्यांचे टेंडर न करता तुकडे पाडून बोगस कंपनीचे आर ओ फिल्टर बसवुन भ्रष्टाचार केला. परंतु कोणत्याही गावांमध्ये आज रोजी या योजनेचा गावातील नागरिकाला फायदा झाला नाही. आर,ओ फिल्टर धुळ खात पडलेली आहेत. प्रत्यक्षात ग्रामपंचायत मधील पंधरावे वित्त आयोग मधील खर्च व मोजमाप पुस्तक मंजूर किती, आराखडा यामध्ये खर्चात खूप तफावत आहे. याची चौकशी कोण लावणार ? व गावातील नागरिकांना शुद्ध पाणी मिळेल याबाबत साधी आमदारांनी विचारपूस सुद्धा केल्याची दिसत नाही. त्यांना महागाव तालुक्यातील शेतकऱ्यांच्या व नागरिकांच्या कोणत्या समस्या आहेत हे माहीत नाही. त्यामुळे जनतेमध्ये चर्चेला उधान आले आहे. माननीय पंतप्रधान व मुख्यमंत्री यांची संकल्पपना आहे जल जीवन मिशन अंतर्गत हर घर नळ योजना सफल झाली पाहिजे व सगळ्यांच्या घरी शुद्ध पाणी मिळाले पाहिजे परंतु महागाव तालुक्यामध्ये ही योजना सफल होताना दिसत नाही या योजनेमध्ये भ्रष्टाचार केलेल्या ठेकेदार व अधिकारी यांच्यावर कारवाई आमदार करून दाखवतील का ?



