उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्तमोफत एन्जोप्लास्टि व बायपास सर्जरी शिबिराच्या आयोजन

शेख मुजाहिद ससंपादक मो. 7798306192
२५ जुलै ते २५ ऑगस्ट २०२५ पर्यंत शिबीर कमलनयन बजाज हॉस्पिटल व एमआयटी हॉस्पिटल छ संभाजीनगर येथे सुरू राहणार आहे अशी माहिती शिबिराच्या आयोजक कळमनुरी चे माजी उपनगराध्यक्ष मो नाजीम रजवी यांनी दिली आहे
कळमनुरी (शहर प्रतिनिधी) राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त दरवर्षीप्रमाणे याही वर्षी कळमनुरी चे माजी उपनगराध्यक्ष मो नाजीम रजवी यांच्या वतीने मोफत एन्जोप्लास्टि व बायपास व वालची सर्जरी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे सदरील शिबिर हे छ संभाजीनगर औरंगाबाद येथील कमलनयन बजाज हॉस्पिटल व एमआयटी हॉस्पिटल येथे दिनांक २५ जुलै २०२५ते २५ ऑगस्ट २०२५ पर्यंत सुरू राहणार आहे या शिबिरात छ संभाजीनगर औरंगाबाद कमलनयन बजाज हॉस्पिटल चे येथील प्रसिद्ध हृदयविकार तज्ञ डॉ सचिन मुखेडकर कार्डिओलॉजिस्ट
डॉ महेश केदार कार्डियाक सर्जन
डॉ महेंद्रसिगं परीहार लाहान मुलांचे कार्डिओलॉजिस्ट हे तज्ञ डॉक्टर शिबिरात आलेल्या रुग्णाचे तपासणी व उपचार करणार आहे कळमनुरी चे माजी उपनगराध्यक्ष मो नाजीम रजवी यांच्यावतीने अनेक वर्षापासून अशाप्रकारे शिबिराचे आयोजन करण्यात येते या शिबिरात डॉ सचिन मुखेडकर डॉ महेश केदार डॉ महेंद्रसिंग परिहार यांनी हजारो रुग्णाचे उपचार यशस्वीरित्या केले आहे
याचप्रमाणे याही वर्षी दिनांक २५ जुलै २०२५ ते २५ ऑगस्ट २०२५ पर्यंत असे एक महिना हे शिबिर सुरू राहणार आहे या शिबिरात डॉ सचिन मुखेडकर एन्जोप्लास्टी करणार आहे तर बायपास व वाल ची सर्जरी डॉ महेश केदार हे करणार आहे तर लाहान मुलांचे हृदयात छिद्र आहे अशा रुग्णाचे उपचार डॉ महेंद्रसिंग परीहार हे करणार आहे शिबिरात येणाऱ्या रुग्णांनी केलेले तपासण्या चे रिपोर्ट सोबत आणावे या शिबिरात जास्तीत जास्त रुग्णांनी आपले उपचार करून घ्यावे असे आवाहन कळमनुरीचे माजी उपनगराध्यक्ष मो नाजीम रजवी यांनी केले आहे
दि २४ ऑगस्ट २०२५ रोजी हिंगोली येथील आई हॉस्पिटल येथे मोफत टू डी इको तपासणी करण्यात येणार आहे
कमलनयन बजाज हॉस्पिटल छ संभाजीनगर औरंगाबाद येथील येथील प्रसिद्ध हृदयविकार तज्ञ डॉ सचिन मुखेडकर डॉ महेश केदार डॉ महेंद्रसिंग परिहार हे दिनांक २४ ऑगस्ट २०२५ रोज रविवार वेळ ११ते ३ वाजे पर्यंत हिंगोली येथील आई हॉस्पिटल टेहेरे हॉस्पिटल च्या बाजू ला एन टी सी मध्ये रुग्णाची मोफत टु डी इको तपासणी करणार आहे याचा जास्तीत जास्त रुग्णांनी फायदा घ्यावा असे आव्हान करण्यात आले आहे



