Uncategorized

विडुळ येथे ओबीसीची चिंतन बैठक पडली पार

१७ सप्टेंबर रोजी उमरखेड येथे ओबीसीचा एल्गार मोर्चा

शेख मुजाहिद ससंपादक मो7798306192

ओबीसी समाजाच्या आरक्षणावर कुठल्याही प्रकारची कुरघोडी न होता त्यांचे शैक्षणिक राजकीय आरक्षणाचे न्याय – हक्क अबाधित ठेवण्यासाठी तालुक्यातील अनेक ठिकाणी सकल ओबीसी संघटन उमरखेडच्या वतीने संवाद दौरा चालू असून त्या अनुषंगाने आज रोजी ओबीसी समाजाची विडुळ सर्कल येथे चिंतन बैठक आयोजित करण्यात आली होती.


आज रोजी विडुळ येथे ओबीसी समाजाची चिंतन बैठक विकास मुलंगे, संदीप हिंगमिरे, डॉ. शिवचरण हिंगमिरे यांच्या पुढाकाराने आयोजित कारणात आली होती.
या बैठकीस ओबीसी नेते ॲड. संतोष जैन ,बाळासाहेब चंद्रे, सुनिल पाटील चिंचोलकर, दिलीप सुरते यांची प्रमुख उपस्थिती लाभली होती. मान्यवरांकडून उपस्थित ओबीसी बांधवांना विविध विषयी मार्गदर्शन करण्यात आले. सरकारच्या निर्णयामुळे ओबीसी समाजाच्या मनात अन्याय झाल्याची भावना व्यक्त केली तसेचसरकारच्या

या निर्णयामुळे ओबीसी समाजावर होणाऱ्या दूरगामी परिणामावर सुद्धा चिंता व्यक्त केली. उपस्थित ओबीसी बांधवांनी १७ सप्टेंबर रोजी उमरखेड येथे होणाऱ्या ओबीसीच्या एल्गार मेळाव्याला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचा निर्धार सुद्धा यावेळी बोलून दाखविला. यावेळी विडुळ येथील ओबीसी समाज बांधव मोठा संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button