Uncategorized

शेतकऱ्याची विष पिऊन आत्महत्यामहागाव तालुक्यात शेतकऱ्याच्या आत्महत्या थांबेना

महागाव प्रतिनिधी संजय नागरगोजे
निसर्गाच्या लहरीपणामुळे व वन्य प्राण्याचे हैदोसामुळे व अतिवृष्टीमुळे शेतातील कापसाचे मोठे नुकसान झाल्याने खाजगी सावकाराचे कर्ज कसे फेडावे अशा विवचनेत असलेल्या माळवागत येथील अल्पभूधारक शेतकरी सुभाष गोबरा चव्हाण वय 55 वर्षे याने शेतातच अराउंड कंपनीचे तन नाशक औषध बुधवार रोजी दहा वाजता प्रशासन केले घरी आल्यानंतर विष पेल्याचे कुटुंबाला सांगितले येथील सामाजिक कार्यकर्ते मोहन चव्हाण यांनी लगेच प्राथमिक उपचार करता पुसद येथील ग्रामीण रुग्णालयांमध्ये भरती करण्यात आले होते परंतु प्रकृती सुधारा होत नसल्याने यवतमाळ येथे शासकीय रुग्णाला हलविण्यात आले होते उपचाराला दाद न देणाऱ्या शेतकऱ्याने अखेर प्राण सोडले आत्महत्या मुळे माळवागात येथे दुःखाचे सावड पसरले आहे. माळवागत येथील अल्पभूधारक शेतकरी सुभाष गोबर चव्हाण व 55 वर्षे याच्याकडे अडीच एकर शेती आहे या शेतामध्ये उसनवारीने कर्ज घेऊन कापसाची लागवड केली होती परंतु निसर्गाच्या लहरीपणामुळे अतिवृष्टी झाल्यामुळे कापूस पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यामुळे हाताशी असलेले कापूस पीक पूर्ण नष्ट होत असलेले दिसू लागले आता आपल्या हाती कोणतेच उत्पन्न येणार नसून उसनवारी घेतलेले कर्ज कसे फेडायचे असा विचार त्याच्या मनामध्ये आल्याने बुधवारी शेतामध्ये फेरफटका मारण्यासाठी गेला असता नष्ट झालेले कापसाचे पीक पाहून डोक्यावर हात ठेवून तन नाशक औषध प्राशन केले व घरी आल्यावर घरच्या कुटुंबाला वीस प्राशन केल्याचे सांगितल्यावर कुटुंबामध्ये एकच खळबळ उडाली गावातील कार्यकर्त्यांनी उपचाराकरता नेले असता बुधवारी शासकीय रुग्णालयात भरती करण्यात आले होते त्यांच्या शरीराने साथ न दिल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला त्यामुळे गावामध्ये हळहळ व्यक्त होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button