Uncategorized

जगण्याची खरी क्रांती शिक्षणातच दडलेली आहे – यशाची मशाल प्रतिक्षाने पेटवली!”

(डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांची प्रत्यक्ष प्रेरणा प्रतिक्षा धुळेच्या यशातून प्रकट)

उमरखेड (दि. 27 ऑगस्ट)शिक्षण हेच खरे शस्त्र आहे ज्याने गुलामगिरीची बेडी तुटते” असे सांगणारे महापुरुष डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी बहुजन समाजाला शिक्षणाची मशाल दिली. आज त्या विचारांचा प्रत्यय उमरखेड तालुक्यातील विडूळ येथील कु. प्रतिक्षा अशोकराव धुळे हिने NEET परीक्षेत मिळवलेल्या घवघवीत यशातून आला आहे.

गरीबीत जन्माला आलेली प्रतिक्षा आई–वडिलांच्या मोलमजुरीच्या जोरावर शिकली. दहावीमध्ये 97.40% व बारावीत 82.80% अशी उल्लेखनीय कामगिरी करून तिने 2025 च्या NEET परीक्षेत 491 गुण मिळवत वैद्यकीय शिक्षणासाठी मुंबईतील H.B.T & Cooper या नामांकित महाविद्यालयात प्रवेश मिळवला.

हे यश केवळ एका विद्यार्थिनीचे नाही, तर संपूर्ण समाजाला धडा देणारे आहे की “श्रीमंत असो वा गरीब, स्त्री असो वा पुरुष – शिक्षणाशिवाय कोणताही समाज पुढे जाऊ शकत नाही.”

बाबासाहेबांनी स्पष्ट सांगितले होते :
“ज्याच्याकडे शिक्षण आहे तोच समाज उन्नत होतो.”
“शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा.”

याच विचारांचा वारसा प्रतिक्षाने आपल्या मेहनतीतून व यशातून सिद्ध केला आहे.

आज तिच्या यशाबद्दल धुळे कुटुंबासह आजी-आजोबा, नातेवाईक व समाजातील प्रतिष्ठित मंडळींनी अभिनंदनाचा वर्षाव केला. गरीब घरातील मुलगी आज डॉक्टर होण्यासाठी मुंबईकडे प्रस्थान करत आहे, हे दृश्य प्रत्येक कुटुंबाला प्रेरणा देणारे आहे.

श्रीमंत असो वा गरीब, स्त्री असो वा पुरुष – शिक्षण हेच खरे शस्त्र आहे, शिक्षण हेच खरे भांडवल आहे आणि शिक्षणाशिवाय समाजाचा उद्धार होणार नाही!
संजय वाघमारे उमरखेड 9302601023

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button