हिमायत नगर : प्रभाग क्र. १४ मधील चिखलाच्या समस्येवर मात; नगराध्यक्ष शेख रफीक व जिल्हा उपाध्यक्ष फेरोज खान यांच्या मार्गदर्शनाखाली नगरसेवक मो. मुजतबा यांचा कौतुकास्पद पुढाकार!

हिमायतनगर (तालुका प्रतिनिधी : शेख खय्यूम) : नगर पंचायत हद्दीतील प्रभाग क्रमांक १४ मधील रस्त्यावर पाणी आणि चिखल साचल्याने नागरिकांना तसेच वाहनधारकांना ये-जा करताना मोठा त्रास सहन करावा लागत होता. चिखलामुळे गाड्या घसरून अपघात होण्याचा धोका निर्माण झाला होता.
नागरिकांची ही अडचण लक्षात घेऊन, नगराध्यक्ष शेख रफीक शेख महेबूब आणि अल्पसंख्याक विभागाचे नांदेड जिल्हा उपाध्यक्ष फेरोज खान यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक नगरसेवक मो. मुजतबा अब्दुल मतीन यांनी तातडीने कामाला सुरुवात केली.
नगरसेवक मो. मुजतबा अब्दुल मतीन यांनी स्वतः प्रत्यक्ष उपस्थित राहून रस्त्यावर गिट्टी व चोरी पसरवून डागडूजीचे काम पूर्ण करून घेतले. यामुळे चिखलाची समस्या दूर होऊन रस्ता वाहतुकीसाठी सुकर झाला आहे.
”नगराध्यक्ष शेख रफीक आणि जिल्हा उपाध्यक्ष फेरोज खान यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभागातील नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत,” असे नगरसेवक मो. मुजतबा अब्दुल मतीन यांनी सांगितले.
या कामाबद्दल परिसरातील रहिवाशांनी नगराध्यक्ष शेख रफीक, जिल्हा उपाध्यक्ष फेरोज खान आणि नगरसेवक मो. मुजतबा यांचे आभार मानले.



