संस्कार पोदार लर्न स्कूलचे विद्यार्थी ठरले उमरखेड आयडॉल – २०२५

“संस्कार पोदार लर्न स्कूलचे विद्यार्थी केवळ शैक्षणिक क्षेत्रातच नव्हे, तर सांस्कृतिक परंपरेचे जतन करणाऱ्या उपक्रमांतही आघाडीवर आहेत.
-प्राचार्य डॉ. भैरोबा मुंजाळ
शेख मुजाहिद ससंपादक मो.7798306192
उमरखेड : “सूर अभंगाचा भव्य एकल भजन स्पर्धा – उमरखेड आयडॉल” या उपक्रमाचे आयोजन दिनांक २४ ऑगस्ट २०२५ रोजी सिद्धेश्वर महादेव मंदिर, उमरखेड येथे करण्यात आले.
या स्पर्धेत संस्कार पोदार लर्न स्कूलच्या विद्यार्थ्यांनी अभंग सादर करून रसिकांची मने जिंकली. त्यामध्ये विधी वैभव कोडगीरवार हिने “कानडा राजा पंढरीचा” हा अभंग सादर करून द्वितीय क्रमांक पटकावला तर स्वरांजली परमानंद जाधव हिने “विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म” हा अभंग सादर करून तृतीय क्रमांक मिळवला.
तसेच अनुष्का दत्तराव वाघमारे, मंजिरी उदयसिंह नाईक, कार्तिकी विशाल माने, ज्ञानेश्वरी सुधाकर थोटे, विदीता जिवन लव्हांडे या पोदार स्कूलच्या विद्यार्थ्यांनीही सहभाग नोंदविला आणि आपल्या सुरेल सादरीकरणाने उपस्थितांचे मन मोहून टाकले.
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेचे प्राचार्य डॉ. भैरोबा मुंजाळ, प्रशासकीय अधिकारी अतिश दिघेवर यांचे मार्गदर्शन लाभले.

त्याबद्दल प्राचार्य डॉ. भैरोबा मुंजाळ यांनी समाधान व्यक्त करून सांगितले की, “संस्कार पोदार लर्न स्कूलचे विद्यार्थी केवळ शैक्षणिक क्षेत्रातच नव्हे, तर सांस्कृतिक परंपरेचे जतन करणाऱ्या उपक्रमांतही आघाडीवर आहेत. अशा स्पर्धांमुळे विद्यार्थ्यांमध्ये मूल्यसंस्कार, कलात्मकता व आत्मविश्वास वाढीस लागतो. आमच्या विद्यार्थ्यांनी उमरखेड आयडॉल स्पर्धेत मिळवलेले यश हे संपूर्ण शाळेसाठी अभिमानास्पद आहे.”
संस्थेचे संचालक राजेश देशमुख, अजय क्षीरसागर, निशांत बयास, धिरज बगाडे यांनी सर्व विद्यार्थ्यांचे विशेष कौतुक केले.
विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन करून संगीताची गोडी लावण्यासाठी शाळेचे संगीत शिक्षक श्री. परमानंद जाधव व सौ. शारदा जाधव यांचे मार्गदर्शन मोलाचे ठरले .
भजन परंपरेला उजाळा देत पोदार स्कूलच्या विद्यार्थ्यांनी घेतलेली ही भागीदारी प्रेक्षकांनी मोठ्या कौतुकाने दाद देत गौरवली.



