Uncategorized

संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष शिवश्री प्रवीणदादा गायकवाड यांच्यावरील भ्याड हल्ल्याचा महागाव येथे जाहीर निषेध


महागाव प्रतिनिधी – संजय नागरगोजे
संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष, शिव फुले शाहू आंबेडकर यांचे विचार रुजविणारे, महाराष्ट्रातील युवकांचे आधारस्तंभ शिवश्री प्रवीण दादा गायकवाड यांच्यावर दि.१३ जुलै रोजी अक्कलकोट येथे दीपक काटे व इतर ७- ८ गुंड प्रवृत्तीच्या लोकांकडून जीवघेणा हल्ला करून त्यांच्यावर शाई फेकण्यात आली या प्रकरणाचा महागाव येथे जाहीर निषेध करण्यात आला. पुरोगामी महाराष्ट्रामध्ये शिव फुले शाहू आंबेडकर विचारांचे काम करणाऱ्या लोकांवरती अशा प्रकारे हल्ला करणे हे मानवतावादी विचाराला काळीमा फासणारा प्रकार आहे. अशा गुंड प्रवृत्तीच्या लोकांना अटक करून कठोरातील कठोर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात यावी अशा आशयाचे निवेदन माननीय तहसीलदार साहेब व माननीय ठाणेदार साहेब महागाव यांच्यामार्फत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड, बामसेफ, भारतीय विद्यार्थी मोर्चा, राष्ट्रीय मुस्लिम मोर्चा, वीर भगतसिंग विद्यार्थी परिषद या समविचारी संघटनेकडून देण्यात आले. यावेळी उदय भाऊ नरवाडे, आशिष गावंडे, प्रमोद जाधव, डॉ. संदीप शिंदे, पंकज देशमुख, जयशील कांबळे, डॉ. ज्ञानेश्वर खंदारे, तेजस नरवाडे, विनोद बनसोडे, संदीप जासूद, चतुर्वेद अडकिने, सलीम भाई, आनंदराव दाताळकर, विठ्ठल वाघमारे, स्वप्निल नरवाडे, समाधान इंगळे, सुदाम गायकवाड, सूर्यकांत कांबळे अदि उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button