Uncategorized

हिवरा येथील एकविरा लॉजिंग वरील जुगार अड्ड्यावर धाडतुळजापूर नागपूर हायवे वरील हॉटेल व लॉज अवैध धंद्याचे माहेरघर!


महागाव प्रतिनिधी संजय नागरगोजे
महागाव तालुक्यात हिवरा येथे स्थानिक गुन्हा शाखा पुसद यांना बरेच दिवसापासून एकविरा लॉजिंग वर अवैध व्यवसाय व जुगार अड्डा सुरू असल्याबाबत गोपनीय माहिती मिळाली होती. दिनांक 15-7- 2025 रोजी सायंकाळी 8 सुमारास धाडीची कारवाई करण्यात आली. त्यामध्ये सात आरोपी गोल रिंगण करून अंदर बाहेर खेळ खेळत असताना रंगे हात पकडले त्यांच्याकडून 78 340 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. त्यामध्ये आरोपी राजेश मगरे ,तथागत मानकर, विनोद भारती, सिद्धार्थ तामगडे ,प्रल्हाद कांबळे, वसंत पवार, श्रीकांत राठोड सर्व राहणार माहूर यांच्यावर जुगार ऍक्ट प्रमाणे महागाव पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला. त्यामध्ये सात आरोपी करण्यात आले . परंतु लॉज मालकावर कोणतीही कारवाई करण्यात आली नाही? त्यामुळे चर्चेचा विषय बनला आहे. हिवरा व धनोडा येथे मोठ्या प्रमाणात मटका व जुगार खुलेआम दुकान लावून सुरू आहे. त्यावर मात्र कारवाई झाली नाही. हे विशेष ! त्यामुळे हिवरा गावातील सामाजिक कार्यकर्ते यांनी वरिष्ठांकडे अवैध धंदे बंद करण्याबाबत निवेदन दिले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button