क्रांतीज्योती सावत्रीबाई व राजमाता जिजाऊ जन्मोत्सवा निमित्य महाआरोग्य शिबीर संपन्न

उमरखेड तालुका प्रतिनिधी सुरेंद्रनाथ पंजाबराव दळवी
उमरखेड:सतत २७ वर्षांपासून चातारी येथे क्रांतीज्योती सावत्रीबाई फुले व राजमाता जिजाऊ जन्मोत्सवाचे आयोजन केले जात आहे. याही वर्षी या निमित्याने प्रबोधनात्मक कार्यक्रम व आरोग्य शिबिर आयोजन केले होते. याहीवर्षी या सोहळयाच्या निमित्याने दि. ११/१/२०२६ रोज रविवारला सकाळी ११ ते दुपारी ४ पर्यंत आयोजित महाआरोग्य शिबिरात गरजू रुग्णांना मोफत तपासणी व मोफत औषधोउपचार सुविधा देण्यात आल्या.त्यात प्रामुख्याने
(ECG, RBS. Lipid Profile & HBA1C ह्या तपासण्या मोफत देण्यात आल्या. विशेष म्हणजे शिबिरातील रुग्णासाठी एक महिन्यापर्यंत X-RAY व इतर तपासण्यात श्रीसिध्दीविनायक हॉस्पीटल मध्ये तपासण्यासाठी ५०% सूट देण्या येईल अशी सुविधा केली.
या शिबिरात तज्ञ् डॉक्टर
डॉ. जयराम बस्सी, छातीरोग, दमा व मधुमेह तज्ञ्,
डॉ. विक्रांत भोसकर, दंत व मुखरोगतज्ञ,
डॉ. मंगेश नरवाडे, नवजात शिशु व बाळरोग तज्ज्ञ,
डॉ. दिपक माने जनरल तपासणी व उपचार,
डॉ. सायली भोसकर दंत व मुखरोगतज्ञ,
डॉ. टी.ए.माने नेत्ररोग निदान व उपचार, डॉ. श्याम भुजंगराव दळवी, (प्रसुती व स्त्रीरोग तज्ञ )
डॉ. शिवानंद फुलाजी कवाणे, (M.S., (SHALYA) मूळव्याध उपचार तज्ञ्, यात तज्ञांनी महा शिबिरात तपासणी करून उपचार केलेत. या कार्यक्रमाचे उद्घाटन मा. बापूराव माने गुरुजी यांनी केले, सदर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान मा.ऍड. संतोष जैन जेष्ठ विधीतज्ञ उमरखेड यांनी भूषविले तर प्रमुख मान्यवर म्हणून मा.धोंडबाराव माने, माजी सदस्य, जिनप्रेस.मा. जि. के. हामदं, सेवा निवृत्त तहसीलदार हे

उपस्थितीत होते. उदघाट्न सत्रात गावातील जे वेगवेगळ्या क्षेत्रात नोकरीला लागले तसेच आपापल्या क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्तींचा सत्कार करण्यात आला त्यामध्ये
सत्कार मूर्ती कु. सई. टि. माने बॅटमिंटन मध्ये राज्यस्तरीय तृतीय, पूजा मस्के, संदीप माने, ओंकार शिंदे, शाम शिंदे, किशोर खांडरे हे वेगवेगळ्या क्षेत्रात नोकरीला लागल्याने यांचा सत्कार करण्यात आला.
जिजाऊ जन्मोत्सव समिती चातारी व स्व. दिगांबरराव पसलवाड बहुउद्देशीय संस्था, चातारी यांनी सदर महा शिबिराचे आयोजन करून यशस्वीरित्या संपन्न केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिवाजीराव माने तर आभार प्रदर्शन बंडू हामंद यांनी केले ५५० रुग्णांनी सहभाग नोंदवून तपासणी व उपचार घेतले. कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी बंडू
हामंद, भगाजी शिवरतवाड, गजानन भाऊराव माने, चंद्रकांत पवार, हमीद खान पठाण, शिवाजी नरवाडे, श्रीकांत माने, सुजित एस माने, अंकुश धात्रक, गजानन प्र.माने, समाधान भवर, सौ पुष्पा वाठोरे, सौ शारदा कलाने, सौ सुरेखा रणवीर, सौ.प्रभावती वंचेवाड,सौ. सुरेखा वानखेडे,सौ. वनमाला वंचेवाड,कु आरती वाठोरे आदिनी अथक परिश्रम घेतले.



