निजधाम आश्रम संस्थेचे अध्यक्ष तथा मार्गदर्शक मा.श्री.पी.बी.वानखेडे साहेब यांचा 85 वा अभिष्टचिंतन सोहळा……..

मागाव प्रतिनिधी संजय नागरगोजे
महागाव तालुक्यात निजधाम आश्रम मुडाणा येथे त्यांच्यावर मनापासून प्रेम करणाऱ्या मंडळीच्या साक्षीने संपन्न झाला.
सदर अभिष्टचिंतन सोहळ्याच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून निजधाम आश्रम संस्थेचे संचालक मा.श्री.सदानंद पाटील साहेब होते,तर प्रमुख पाहुणे म्हणून हभप तानाजी बापू,श्री.अशोक वानखेडे,वैभव बरडे यांची उपस्थिती होती.
कार्यक्रमाच्या सुरवातीस स्व.श्री.संत एकनाथ महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन तथा पुष्पहार अर्पण करून मान्यवर मंडळी तसेच आजचे सत्कारमूर्ती मा.श्री.वानखेडे यांचे हस्ते झाले व विद्यालयातील विद्यार्थीनींच्या स्वागतगीत गायनाने झाली,त्यानंतर कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि उपस्थिती सर्व मान्यवर तथा पाहुणेमंडळी यांचे स्वागत करण्यात आले,कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री.सावंत सर यांनी केले.त्यानंतर आज ज्यांच्यासाठी हा कार्यक्रम आयोजित केला होता ते महान व्यक्तिमत्व,ऋषितुल्य मा.श्री.पी.बी.वानखेडे साहेब यांचा सर्वांच्यावतीनेयथोचित

सन्मान तथा सत्कार व त्यांच्या कार्याचा गौरव करणारे “सन्मानपत्र”त्यांना प्रदान करून तसेंच पुष्पगुच्छ देऊन सपत्नीक आहेर करून केक कापून त्यांना 85 व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन आनंदात साजरा करण्यात आला.अभिष्टचिंतन सोहळ्याला संस्थेचे संचालक सर्वश्री.देवानंद वानखेडे,दिलीपराव तरटे,अनिल खंदारे,राम ठाकरे,तर प्रमुख उपस्थितीती मध्ये सर्वश्री.गणपतजी डाखोरे,दिपचंद बांडे,बाभळे काका,बाजीराव पाटील,गजानन मुधोळ,अतुल येणकर,अंबादास पाटील,आबासाहेब येणकर,गजानन वानखेडे,वामन येणकर,प्रकाश कदम,अशोक येणकर,अनिल मिस्त्री,आत्माराम इंगळे,भाऊसाहेब ठाकरे,अनिल डहाळे,मयूर काळे,प्रवीण राजूरवाडे,विपुल धोंगडे,बाळासाहेब जाधव,हरीश सोळंके,विनोद येणकर,सतिष शिंदे,महागाव तालुका पत्रकार संघाचे मा.श्री.गजानन वाघमारे साहेब,श्री.निलेश नरवाडे पाटील,श्री.राज पाटील,श्री.पवन रावते पाटील तसेच निजधाम आश्रम विद्यालयाचे शिक्षकबंधू तथा शिक्षिकाभगिनी,शिक्षकेत्तर कर्मचारी तसेंच डॉ.गायत्री आसोले मॅडम पुसद आणि ज्यांच्या मार्गदर्शनात हा सोहळा आयोजित केला होता ते श्री.सतिष जाधव सर हे सुद्धा उपस्थित होते.कार्यक्रमाअंती सर्व मान्यवर मंडळी यांना अल्पोपहार देऊन आणि विद्यार्थ्यांना पोषक खाऊचे वाटप करून कार्यक्रमची सांगता झाली.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.श्री.जांबुतकर सर यांनी केले तर आभार प्रदर्शन श्री.बोरकर सर यांनी केले…
आदरणीय श्री.वानखेडे साहेब यांचा वाढदिवसानिमित्ताने विद्यालयात वृक्षारोपण करण्यात आले आणि 200 झाडाचे वाटप करण्यत आले तसेंच रांगोळी स्पर्धा,निबंध स्पर्धा विद्यार्थ्यांसाठी आयोजित केली असता त्यामध्ये यश मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना बक्षीसे देण्यात आली.तसेच वाढदिवसानिमित्ताने विद्यालयातील मुलींनां आरोग्यविषयक मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले त्यासाठी पुसद येथील महिला डॉक्टर म्हणून डॉ.गायत्री आसोले मॅडम यांना आमंत्रित केले असता त्यांनी सर्व मुलींना “आपले आरोग्य-आपला हक्क”याबद्दल परिपूर्ण मार्गदर्शन करून आहार-विहार याबद्दल विशेष मार्गदर्शन केले.
बऱ्याच मुलींनी त्यांना आरोग्यविषयक प्रश्न विचारले असता त्यांनी त्यांचे पूर्णपणे आजाराविषयक मार्गदर्शन करून समाधान केले…
सर्वांच्या सहकार्याने आजचा अभिष्टचिंतन सोहळयाचा कार्यक्रम उत्साहात साजरा झाला…
सर्वांचे आभार…..



