Uncategorized

सोनारी टोलनाक्यावर ‘केवायसी’च्या नावाखाली ३५० रुपयांचा दरोडा; त्रस्त वाहनचालक आणि जनतेचा संताप, खासदार नागेश पाटील आष्टीकरांकडे संसदेत जाब विचारण्याची मागणी!


​हिमायतनगर तालुका (शेख खय्यूम प्रतिनिधी)

: सोनारी फाट्यावरील टोलनाका म्हणजे सर्वसामान्य जनतेला लुटणारा अधिकृत डाकू बनला असून येथे भ्रष्टाचारी मनमानीचा असा काही नंगानाच सुरू आहे, ज्याने संपूर्ण तालुक्यात संतापाचा ज्वालामुखी फाटला आहे. या टोलनाक्यावर येणाऱ्या-जाणाऱ्या प्रत्येक निष्पाप वाहनधारकाला ‘केवायसी’ (KYC) अपडेटच्या नावाखाली थेट धमकावले जात असून शासनाचा कोणताही आदेश नसताना जनतेच्या खिशातून तब्बल ३५० रुपये बळजबरीने उकळले जात आहेत. हा थेट डिजिटल दरोडा असून सामान्य जनतेचे कष्टाचे पैसे येथील अधिकारी आणि ठेकेदार संगनमताने लाटत असल्याचा खळबळजनक आरोप स्वतः त्रस्त वाहनचालक आणि स्थानिक नागरिकांनी उघडपणे केला आहे. दुसरीकडे नाक्यावरून दररोज लाखो रुपयांची वसुली ‘जोमात’ सुरू असताना सुविधांच्या नावावर प्रवाशांना केवळ ‘धूळफेक’ आणि ‘नरकयातना’ सहन कराव्या लागत आहेत.
​भर उन्हाळ्यात प्रवाशांना पिण्याचे पाणी मिळत नाही, शौचालयांना कुलूप ठोकल्यामुळे महिलांची विटंबना होत आहे, आणि भोकर ते हिमायतनगर रस्त्यावरील खड्ड्यांमुळे मृत्यूचे सावट पसरले आहे; तरीही टोल कसा वसूल होतो, असा संतप्त सवाल चालक विचारत आहेत. त्यातच १८ वर्षांखालील चिमुरड्यांना बालमजूर म्हणून राबवून घेतले जात आहे. हा मुद्दा थेट राष्ट्रीय महामार्गाशी संबंधित असल्याने, हिंगोली मतदारसंघाचे खासदार नागेश पाटील आष्टीकर आणि स्थानिक आमदारांनी या सुलतानी कारभाराविरुद्ध थेट संसद आणि विधिमंडळ अधिवेशनात आवाज उठवून ही ३५० रुपयांची अवैध लूट तात्काळ बंद पाडावी, अन्यथा टोलनाका पूर्णपणे बंद करून तीव्र चक्काजाम आंदोलन छेडण्याचा इशारा स्थानिक चालकांनी व जनतेने दिला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button