निंगणुर घाटातील पुल ढासळला! ढाणकी ते फुलसावंगी मार्गावरील वाहतुक ठप्प

महागांव, प्रतिनिधी संजय नागरगोजे
राष्ट्रीय महामार्ग 752 वर ढाणकी पासून निंगनूर या रोडवर अवघ्या काहीच अंतरावरील निंगनुर घाटातील पुलाजवळ दोन्ही साईटचा रस्ता पावसामुळे खचला आहे. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे.
दोन दिवसापूर्वी झालेल्या मुसळधार पावसाने अनेक ठिकाणी रस्ता प्रभावीत झाला आहे. ढाणकी मार्गे फुलसांवगी या रोडवरील निंगनूर घाटामध्ये झालेल्या अतिवृष्टी मध्ये पुलाचा दोन्ही साईडचा भाग ढासळला आहे. यामुळे ढाणकी फुलसांगवी मार्गे किनवट वाहतुक ठप्प झाली आहे. तसेच पुसद मार्गाकडे या भागातील प्रवाशांना हाच मार्ग जवळचा असल्याने वाहन धारकांना या रस्त्याने प्रवास करणे अतिशय त्रासदायक होत आहे. या मार्गावरून राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस बंद असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. तसेच मानव विकासच्या बसलेल्या बंद असल्याने विद्यार्थ्यांना याचा फटका बसत शैक्षणिक नुकसान होत आहे, परिणामी विद्यार्थ्यांचे शैक्षणिकदृष्ट्या भवितव्य अंधकारमय होतआहे. अर्धापूर ते माहूर नॅशनल हायवे रस्ता 752 या निंगनूर घाटातील अतिशय अरुंदरस्ता आणि अरुंदपुल असल्यामुळे राष्ट्रीय महामार्ग कार्यकारी अभियंता व शाखा अभियंता यांना दूरध्वनी द्वारे विचारांना केली असता सदरील पुलाची तातडीने दुरुस्त होईल असे माध्यमांना सांगण्यात आले. दोन दिवसा पासून निंगणुर घाटातील पुलाजवळ दोन्ही साइटच्या पुलाची देखभाल दुरुस्त केली नाही. राष्ट्रीय महामार्गाचे अधिकारी या नादुरुस्त पुलाच्या डागडुगी साठी दुर्लक्ष करीत असून असुरी आनंद घेत असल्याचा जनतेतून आरोप होत आहे. या ठिकाणी एखादी मोठी दुर्घटना होऊन जीवित हानी झाल्यास या समस्येसाठी सर्वस्वी जबाबदार कार्यकारी अभियंता शाखा अभियंता असल्याचे त्यांच्याप्रती नागरिकातून रोष व्यक्त होत आहे, तातडीने काम होण्याची नागरिकातून मागणी केली जात आहे.



