Uncategorized

वंदे मातरम् गीताने भरला उत्साहधो धो पावसातही स्वातंत्र्य दिन साजरा१५ ऑगस्ट २०२५

शेख मुजाहिद ससंपादक मो.7798306192

उमरखेड मागील दोन दिवसांपासून वरून राजाची कृपा होत असून संततधार पाऊस बरसत असून सुद्धा उमरखेड येथील उपक्रमशील शाळा म्हणून गणल्या जाणाऱ्या संस्कार पोदार लर्न स्कूल मध्ये स्वातंत्र्य दिन उत्साहाने साजरा करण्यात आला.
मान्यवरांच्या हस्ते भारत मातेच्या प्रतिमेचे पूजन आणि ध्वजारोहण करण्यात आले लहान लहान विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या भारत माता, महात्मा गांधी, शहीद भगतसिंग, शेतकरी,सैनिक यांच्या वेशभूषा आकर्षक लक्षवेधी ठरल्या. आपल्याला मिळालेले स्वातंत्र्य हे सहजासहजी मिळाली नसून त्याकरिता असंख्य देशभक्तांनी आपल्या प्राण्याची आहुती दिली स्वातंत्र्याचा लढा तीव्र केला तेव्हा कुठे स्वातंत्र्य मिळालेअसे वक्तव्य विद्यार्थ्यांनी दिलेल्या भाषणांमधून केले.देश सेवा ही प्रत्यक्षात सीमेवर जाऊन शत्रूशी दोन हात करून करता येते त्याचप्रमाणे प्रत्येक नागरिकांनी आपण करीत असलेल्या कार्यक्षेत्रात प्रामाणिकपणे सुजाण नागरिक म्हणून आपली कर्तव्य बजावत असताना सुद्धा देश सेवा घडू शकते याचे उदाहरण म्हणजे आपण रस्त्याने जात असताना ट्राफिक सिग्नल लागले आणि आपण त्या ट्राफिक सिग्नलच्या नियमांचे पालन केले तर ती सुद्धा एक देशसेवा असल्याचे प्रतिपादन प्रिन्सिपल बी व्ही मुंजाळ यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत असताना

केले. धो धो पाऊस बरसत असताना सुद्धा स्वातंत्र्य दिन साजरा करीत असताना विद्यार्थ्यांच्या उत्साहाचा वाढता आलेख बघायला मिळाला, कार्यक्रमाचे समारोपप्रसंगी राष्ट्रभक्तीने प्रेरित होऊन वंदे मातरम् हे गीत सामूहिक रित्या सादर होत असताना शाळेचा संपूर्ण परिसर देशभक्तीमय झाला होता. स्वातंत्र्य दिन यशस्वीरित्या पार पाडण्याकरिता संचालक मंडळाचे मार्गदर्शनाखाली प्रिन्सिपल, प्रशासकीय अधिकारी, समन्वयक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे सह विद्यार्थ्यांनी सुद्धा परिश्रम घेतले हे विशेष.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button