दारापुढे कार ,आयकर भरणार; त्यांचे रेशनचे धान्य बंद होणार का?( बोगस राशन कार्ड धारक घेतात शासकीय मोफत धान्याचा लाभ )

संजय नागरगोजे महागाव प्रतिनिधी
उमरखेड तालुक्यात पुरवठा निरीक्षण अधिकारी यांनी राशन कार्ड धारकांची पडताळणी न केल्या मुळे ज्यांच्या घरी चार चाकी गाडी आहे घरामध्ये एखादा व्यक्ती शासनाच्या नोकरीवर आहे अशा लोकांना रेशन कार्डधारक मोफत धान्य योजनेचा लाभ घेत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे पुरवठा विभागाकडून शोध मोहीम राबविणे गरजेचे आहे .गरजू व्यक्ती धान्यापासून वंचित राहत आहेत. शासनाच्या ध्येय धोरणानुसार ज्यांच्या घरी चार चाकी वाहन आहे .ते कोणतेही असो, तसेच ज्यांच्या घरी एखादा व्यक्ती शासनाच्या नोकरीवर आहे. अशा व्यक्तींचे राशन कार्ड शोध मोहीम राबवून अपात्रतेची कारवाई करणे आवश्यक आहे. सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत अंतोदय अन्न योजना आणि प्राधान्य कुटुंब योजना अंतर्गत रेशन कार्ड लाभार्थ्यांना दरमहा मोफत धान्याचा लाभ देण्यात येतो परंतु चार चाकी मालक आयकर दाते सरकारी कर्मचारी तसेच एक लाख रुपये पेक्षा जास्त उत्पन्न असणारे कार्डधारक सुद्धा हा लाभ घेत आहे . काही राशन कार्ड धारक बनावट कागदपत्रे तयार करून राशन दुकानातून धान्याचे उचल करीत आहेत. तालुक्यातील रेशन कार्ड लाभार्थ्याची यादी शासनामार्फत पुरवठा विभागाला प्राप्त झाली आहे. त्यानुसार संबंधित लाभार्थ्यांचा पुरवठा विभागामार्फत शोध घेणे आवश्यक असून त्यांचे राशन कार्ड पडताळणी नंतर या लाभार्थ्यांचे रेशन धान्य बंद करणे आवश्यक आहे. परंतु उमरखेड तालुक्यात राशन कार्ड धारकाची पडताळणी न झाल्यामुळे बरेच राशन कार्ड लाभार्थी याचा लाभ घेत आहे .राशन धान्य लाभार्थ्यांनी घोषणापत्र भरून पुरवठा विभागात दिले आहे. त्यामुळे त्या कार्डधारकाची पडताळणी पुरवठा विभागातून उमरखेड तालुक्यात करण्यात आली नाही. त्यामुळे शासनाचे धान्य अशा लाभार्थ्यांना सुद्धा मिळत आहे. पात्र लाभार्थ्यांना महिलेला प्रति व्यक्ति १५ किलो गहू 20 किलो तांदूळ आणि प्राधान्य कुटुंब योजना ला रेशन कार्ड धारक लाभार्थ्यांना दरमहा प्रतिव्यक्ती 2 किलो गहू 3 किलो तांदूळ एवढ्या मोफत धान्याचा लाभ शासनातर्फे देण्यात येत आहे. बनावट कागदपत्र तयार करून राशन धान्य उचल करणाऱ्या वर तसेच माहित असून सुद्धा लाभार्थ्यांची माहिती लपून ठेवणाऱ्या स्वस्त धान्य दुकानदारावर फौजदारी कारवाई करणे आवश्यक आहे.



