अण्णाभाऊंच्या प्रेरणेतून निराधार विद्यार्थ्यांना आधार..! सरोज देशमुख.

शेख मुजाहिद ससंपादक मो.7798306192
उमरखेड, दि. १ ऑगस्ट — प्रियदर्शनी इंदिरा गांधी शिक्षण संस्था अंतर्गत माध्यमिक विद्यालय उमरखेड व देशमुख कनिष्ठ महाविद्यालय उमरखेड येथे लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाचे आयोजन संस्थेच्या प्रेरणास्त्रोत, प्रभावी नेतृत्व व सामाजिक भान असलेल्या संस्थेच्या संचालिका तथा जिजाऊ ब्रिगेड प्रदेश सहसचिव सौ. सरोज देशमुख मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सौ. अर्चनाताई उगले होत्या, तर प्रमुख पाहुणे म्हणून सौ. अर्पणाताई राऊत आणि श्री. प्रवीण बानो यांची उपस्थिती लाभली. यावेळी माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक लोमटे सर, कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य वानखेडे सर तसेच ज्येष्ठ शिक्षक पतंगे सर उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. त्यानंतर उपस्थित मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. विशेष म्हणजे, संचालिका सौ. सरोज देशमुख मॅडम सामाजिक जाणिवेतून कित्येक वर्षांपासून संस्थेमध्ये शिक्षणासाठी निराधार चा आधार बनत असतात त्याचं अनुषंगाने अण्णाभाऊ साठे जयंती निमित्त या कार्यक्रमात गरजू व निराधार विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. यात १२ वीतील परमेश्वर उगले, १० वीतील कु. शुभ्रश्री राऊत आणि ८ वीतील आयान खान यांचा समावेश होता. साहित्याचे वाटप सौ. सरोज देशमुख मॅडम यांच्या हस्ते, उपस्थित मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले.
या प्रसंगी विद्यार्थ्यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या प्रेरणादायी जीवनावर आधारित भाषणे आणि गीतांची सादरीकरणे केली.
कार्यक्रमाच्या शेवटी सौ. सरोज देशमुख मॅडम यांनी विद्यार्थ्यांना उद्देशून मोलाचे मार्गदर्शन केले. त्यांनी सांगितले की, आपण कितीही अडचणीत असलो तरी शिक्षणाच्या माध्यमातूनच जीवनात प्रगती करता येते. शिक्षण हेच खरे शस्त्र आहे. यशाच्या दिशेने वाटचाल करताना ध्येयाप्रती निष्ठावान राहणे आवश्यक आहे.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. श्रावणी डोंगरे (वि. ९ वी), कु. वैष्णवी कदम व कु. स्वप्निता भोपळे यांनी केले, तर आभार प्रदर्शन श्री. मुसळे सर यांनी केले. कार्यक्रमाच्या सांगतेनंतर उपस्थित सर्वांना अल्पोपहाराचे आयोजन करण्यात आले.
सामाजिक उत्तरदायित्व जपत, निराधार विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मदतीचा हात पुढे करून सौ. सरोज देशमुख मॅडम यांनी एक प्रेरणादायी पाऊल उचलतात आणि
या उपक्रमात विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे सौ. सरोज देशमुख मॅडम यांनी मागील पंचवीस वर्षांपासून निराधार आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल पार्श्वभूमीतील विद्यार्थ्यांना स्वतः दत्तक घेऊन त्यांच्या शैक्षणिक गरजा स्वतःच्या खर्चाने पूर्ण केल्या आहेत. शैक्षणिक साहित्य, गणवेश, शैक्षणिक फी यापासून ते मानसिक आधार देण्यापर्यंत त्यांचे योगदान मोलाचे आहे. अशा अनेक विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात ठेवून, त्यांनी त्यांचे भविष्य घडवले आहे. याच सामाजिक कार्याचा एक भाग म्हणून, अण्णाभाऊ साठे जयंतीच्या निमित्ताने यावर्षीही गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करून हा प्रेरणादायी उपक्रम राबवण्यात आला.



