संस्कार पोद्दार लर्न स्कूल उमरखेड चा विद्यार्थी गिरीराज ची साहित्य क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी

तालुका प्रतिनिधी
उमरखेड
एस पी दळवी
उमरखेड : संस्कार पोद्दार लर्न स्कूल, उमरखेड येथील इयत्ता नववीतील विद्यार्थी गिरीराज लक्ष्मीकांत मुक्कावार याने अल्पवयातच साहित्य क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत Shri Krishn: The Life Guide हे पुस्तक लिहिले आहे. भगवान श्रीकृष्ण यांच्या जीवनातील तत्त्वज्ञान, आदर्श आणि जीवनमार्ग यावर आधारित हे पुस्तक इंग्रजी भाषेत लिहिण्यात आले आहे, त्यामुळे ते विद्यार्थ्यांसह सर्व वाचकांसाठी प्रेरणादायी आणि मार्गदर्शक ठरणारे आहे.
गिरीराज लक्ष्मीकांत मुक्कावार यांनी लिहिलेले हे पुस्तक नेशन प्रेस या प्रकाशन संस्थेमार्फत प्रकाशित करण्यात आले आहे. लहान वयातच इतक्या सखोल आणि आध्यात्मिक विषयावर साहित्य लेखन करून त्यांनी शाळेचा तसेच उमरखेड शहराचा गौरव वाढवून शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. त्यांच्या या साहित्यिक कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत असून या यशामागे त्यांच्या वडील लक्ष्मीकांत मुक्कावार व आई ज्योत्स्ना मुक्कावार तसेच वडीलधाऱ्या मंडळीचे ही मोठे प्रोत्साहन व मार्गदर्शन लाभले आहे.

या उल्लेखनीय यशाबद्दल संस्थेचे संचालक मंडळातील राजेश देशमुख, अजय क्षीरसागर, निशांत बयास,धीरज बगाडे, प्राचार्य डॉ. भैरोंबा मुंजाळ, प्रशासकीय अधिकारी अतिश दिघेवार तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी गिरीराज मुक्कावर यांचे शाळेच्या वतीने अभिनंदन करून त्यांच्या पुढील साहित्यिक यशस्वी वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.



